Talegaon Dabhade : पाणीपुरवठा विषयक कामाबाबत मुख्याधिकाऱ्यांच्या सूचना

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे (Talegaon Dabhade) नवनियुक्त मुख्याधिकारी एन के पाटील यांनी पाणी पुरवठा विभाग व आरोग्य विभागाचा नुकताच पहाणी दौरा केला. यामध्ये चालू असलेल्या कामकाजा बाबत माहिती घेऊन करावयाच्या कामाबाबत अधिका-यांना सूचना केल्या.

येथील पाणीपुरवठा विभागाच्या आधीन असलेल्या सोमाटणे पंप हाऊस,इंद्रायणी पंप हाऊस,चौराई जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी जलशुद्धीकरण केंद्र येथे स्थळ पाहणी केली,यावेळी  शहर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे,कार्यालयीन अधीक्षक रवींद्र काळोखे, पाणीपुरवठा अभियंता स्मिता गाडे, अभियंता प्रवीण वारिंगे,प्रवीण यादव, ठेकेदार विजय राक्षे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी पूर्व पावसाळी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तसेच विद्युत पुरवठा खंडित झाल्यास अतिरिक्त व्यवस्था करणे,सोमाटणे पंप हाऊस येथील 90 एचपी पंप साठी विद्युत प्रवाह चालू करून वर्किंग मध्ये आणणे, पवना जलपात्रातील शेवाळ व गाळ काढणे,250  एम एम 300 एम एम ची जीर्ण झालेली लाईन बदलणे, रासायन द्रवण टाकी दुरुस्त करणे, राडारोडा काढणे, साठवण टाकीचे संरचनात्मक परीक्षण करणे, यशवंत नगर जलशुद्धीकरण येथे चेनपुली करणे आदी सूचना अधिका-यांना करण्यात आल्या.

Chakan : भीमा नदीच्या काठावरून दिड लाख रुपयांची देशी दारु जप्त

तसेच नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पहाणी केली. सदर स्थळ पहाणी दरम्यान कार्यालयीन अधीक्षक रवींद्र काळोखे, समन्वय गीतांजली होनमाने, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, पर्यवेक्षक ओमकार माने, संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

सदर स्थळ पहाणी दरम्यान शहरातील दररोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा त्यावरील होणारी प्रक्रिये बाबत व मुख्याधिकारी यांनी बारकाईने पहाणी केली, स्थापत्य विषयक झालेली कामे व भविष्यात घनकचरा व्यवस्थापनाबाबत काय सुधारणा अपेक्षित आहेत. याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या.

कार्यालयात वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक घेतली. या सभेच्या अध्यक्षपदी एन के पाटील होते. यामध्ये पावसाळ्यापूर्वीच विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्याची छाटणी करणे, धोकादायक वृक्षांची पाहणी करून त्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करणे, तसेच शहरातील बेकायदेशीर रित्या वृक्षतोडी बाबत शासन नियमानुसार कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करणे आदी निर्णय घेण्यात आले.

सदर सभेसाठी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य निलेश गराडे, विजय महाजन, रौनक खरे उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर महाजन, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र काळोखे, उद्यान समवेत रणजीत सूर्यवंशी, सचिन कहडणे (Talegaon Dabhade) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.