Chakan : भीमा नदीच्या काठावरून दिड लाख रुपयांची देशी दारु जप्त

एमपीसी न्यूज – शेलपिंपळगावच्या (Chakan) हद्दीतील भीमा नदीच्या काठावरून पोलिसांनी दिड लाख रुपयांची देशी दारू व साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.12) सकाळी साडे अकराच्या सुमारास केली.

याप्रकऱणी प्रद्युम्न बिरबल राठोड (वय 32 रा.शेलपिंपळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई निखील वर्पे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : वाकड येथील पंचतारांकीत हॉटेलमधून वेश्या व्यवसाय प्रकरणी एकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बेकायदेशीरपणे भीमानदी काठी झुडपांच्या जवळ हातभट्टीची दारु बनवत होता. याची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला.

यावेळी पोलिसांना दिड लाख रुपयांचे दारु तयार कऱण्याचे 5 हजार लिटर रसायन अढळले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी झुडपांमध्ये पळून गेला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून (Chakan) पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.