Talegaon Dabhade : आंबी ग्रुपग्रामपंचायत पंचक्रोशीतील 300 भाविकांना मोफत देवदर्शनाचा लाभ

एमपीसी न्यूज- मावळ भागातील आंबी ग्रुपग्रामपंचायतमधील वारंगवाडी, गोळेवाडी, आंबी, राजपुरी गावातील ग्रामस्थांसाठी मोफत देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.

या सहलीमध्ये कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, ज्योतिबा देवस्थान, श्री बाळूमामा देवस्थान, नरसोबाची वाडी, केतकावळे येथील तिरुपती बालाजी मंदिर या ठिकाणी भेट देऊन भाविकांना देवदर्शनाचा लाभ मिळाला. या सहलीमध्ये 300 भाविकांनी सहभाग घेतला.

या सहलीचे आयोजन उद्योजक सतीश बबनराव कलवडे, प्रफुल्ल बबनराव शिंदे, महेंद्र खंडुभाऊ वारिंगे, सोमनाथ पवार यांनी केले.

या सहलींमधील भाविकांना निरोप देण्यासाठी वारंगवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुदामराव कदम, उद्योजक सुधाकर शेळके, माजी सरपंच वराळे, निलेश मराठे, उद्योजक श्रीकांत टकले, दत्ताआप्पा घोजगे आदी उपस्थित होते.

या वेळी राजेंद्र वारिंगे, नाथा थोरवे, रामनाथ कलवडे, शिवाजी वारिंगे, विठ्ठल नखाते, दत्तात्रय कलवडे, दत्ता लोंढे, चद्रकांत शिंदे, पंडीत दाभाडे, संजय वारिंगे, नितीन नखाते, दत्तात्रय वारींगे, सोमनाथ गव्हाणे, महेंद्र बो-हाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गणेश काकडे, सुदाम कदम व सुधाकर शेळके यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.