Vadgaon Maval : श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी सोपानराव म्हाळसकर तर सचिवपदी अनंता कुडे

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानची कार्यकारिणीची नुकतीच जाहीर करण्यात आली. संस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी सोपानराव बाबुराव म्हाळसकर व सचिवपदी अनंता बाळासाहेब कुडे यांची निवड करण्यात आली.

धर्मदाय आयुक्त जगताप यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून या विश्वस्त मंडळाची निवड केली. शुक्रवारी (दि. 20) विश्वस्त मंडळाच्या विशेष सभेत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी विश्वस्त अरुण धोंडिबा चव्हाण, तुकाराम ज्ञानोबा ढोरे, सुभाष रघुनाथ जाधव व सुनीता दत्तात्रय कुडे आदि उपस्थित होते. निवडीनंतर विश्वस्त सुभाषराव जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. मुख्य विश्वस्त व सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

मुख्य विश्वस्त- सोपानराव बाबुराव म्हाळसकर, सचिव- अनंता बाळासाहेब कुडे, उपाध्यक्ष- गणेशअप्पा भिकुजी ढोरे, खजिनदार- चंद्रकांत बाळोबा ढोरे, सहसचिव- किरण शंकरराव भिलारे, कायदेशीर सल्लागार- अॅड अशोकराव भिकुजी ढमाले, अॅड तुकाराम पंढरीनाथ काटे

मुख्य विश्वस्त व सचिव यांची झाली हॅट्रीक

सन 1952 साली स्थापन झालेल्या विश्वस्त मंडळाची 1999 ते 2000 सालापर्यंत पूर्वीचे विश्वस्त काम पहात होते. नंतरच्या काळात सदर विश्वस्तांचे निधन झाल्यानंतर काही प्रमुख गावकरी या देवस्थानचे काम पहात होते.

सन 2010 मध्ये मुख्य विश्वस्त श्री सोपानराव म्हाळसकर यांनी पुन्हा गावातील काही प्रमुख मंडळींना बरोबर घेऊन नव्याने विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात पुढाकार घेतला. नंतर पुन्हा 2012 साली त्यात काही बदल होऊन, या विश्वस्त मंडळींनी 7 वर्ष पारदर्शक काम पाहिले, तदनंतर मुदत संपल्याने पुन्हा मुख्य विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्त पुणे यांना अर्ज करून देवस्थानचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्यावी असा अर्ज केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.