Talegaon Dabhade News : पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

एमपीसी न्युज – पत्रकार दिनाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघातील सर्व सदस्यांचा मेधावीन फाउंडेशन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये फाउंडेशनच्या (Talegaon Dabhade News) अध्यक्षा वैशाली दाभाडे व पदाधिकारी सहकाऱ्यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

६ जानेवारी हा पत्रकार दिन सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मेधावीन फाउंडेशनच्या वतीने तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघातील संघाचे संस्थापक सुरेश साखवळकर, अध्यक्ष मनोहर दाभाडे, उपाध्यक्ष तात्यासाहेब धांडे, सचिव सोनबा गोपाळे गुरूजी, खजिनदार बी एम भसे तसेच सदस्य सुनील वाळुंज, अतुल पवार, गणेश बोरुडे, राजेश बारणे, प्रभाकर तुमकर, राजेंद्र जगताप, प्रेस फोटोग्राफर श्रीकांत चेपे या पत्रकारांचा (Talegaon Dabhade News)  सन्मान करण्यात आला.

Sangavi News: धनगर समाजाचा उद्या सांगवीत राज्यस्तरीय वधू-वर मेळावा  

यावेळी तळेगाव नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे,मेधावीन फाउंडेशनच्या संस्थापक वैशाली दाभाडे फाऊंडेशनच्या पदाधिकारी माजी नगराध्यक्ष मायाताई भेगडे, नगरसेविका मंगल भेगडे, स्वाती दाभाडे, स्वाती पवार, अर्चना देशमुख आदी उपस्थित होत्या

यावेळी बोलताना वैशाली दाभाडे म्हणाल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते समाजातील सर्व बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन समाजाच्या हितासाठी पत्रकार काम करतात यामध्ये तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघातील सदस्यांचा (Talegaon Dabhade News)  मोलाचा वाटा आहे.

पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेटून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर, माजी नगरसेवक अरुण माने, जयंत कदम, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.