Talegaon Dabhade : दास नवमी निमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज – श्री दास नवमी निमीत्त तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade) येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.पहाटे पूजा,काकड आरती भजन, महाआरती करण्यात आली. माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शामराव देसाई यांच्या हस्ते श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सुभाष नाईकगुरुजी,अतुल काका देशपांडे,यतिनभाई शहा,किरण गवारे,उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल फाकटकर,विणेकरी संपतराव गराडे, सुभाष बेल्हेकर,पांडुरंग गदादे,निवृत्ती महाराज फाकटकर,छबुराव भेगडे, प्रकाश वालझाडे,हरिदास वनारसे, द्वारकानाथ थोरात,अरविंद हांडे पाटील,किशोर दरेकर,मृदुंगवादक शिंदेबुवा,भजनकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Alandi: विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बाबुलाल घुंडरे यांची बिनविरोध निवड

पहाटे श्री विठ्ठल मंदिरात पूजा, काकड आरती भजन,महाआरती करण्यात आली.श्री समर्थ रामदास स्वामी यांचे प्रतिमेचे पूजन माजी पोलिस निरीक्षक प्रदिप शामराव देसाई यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी शेखरबुवा व्यास महाराजांचे नारदीय किर्तन झाले.त्यानंतर देसाई परिवाराकडून ( Talegaon Dabhade) महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.