Pune: सुप्रसिद्ध गायक रोहित राऊतने गायले ‘नखरेवाली’ गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल 

एमपीसी न्यूज – प्रत्येकाच्या आयुष्यात एक नखरेवाली किंवा (Pune)एखादा नखरेवाला व्यक्ती असतोच. गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती घेवून येत आहेत एक गावरान मराठमोळ गाणं ‘नखरेवाली’, या गाण्याच्या हूकस्टेप अगदी मनात बसणाऱ्या आहेतच शिवाय हे गाण ऐकल्यावर पाय आपोआप थिरकायला देखील लागतात.

 

या गाण्यात निक शिंदे, रितेश कांबळे, अनुश्री माने आणि जाऊ बाई गावात या (Pune)मराठी रिऍलिटी शोची फायनलिस्ट अंकिता मेस्त्री हे कलाकार आहेत. गायक रोहित राऊत सोबत गायिका सोनाली सोनवणे हिने गाण्याला स्वरसाज दिला आहे. या गाण्याच संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी केलं आहे. या गाण्याच दिग्दर्शन रोहित जाधव याने केलं असून या गाण्याच छायाचित्रीकरण सुरज राजपुत याने केल आहे. अभिनेता विशाल निकम, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव अविनाश सोलवट आणि अन्य कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाण्याचा प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला.
गायक रोहित राऊत ‘नखरेवाली’ गाण्याविषयी सांगितले की, “जेव्हा प्रशांतचा मला कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण मराठी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात टॉपची गाणी प्रशांत यांची असतात. आणि त्यांच्यासोबत माझ हे पहिलच गाण आहे. हे गाण रेकॉर्ड करतानाही मला खूप मज्जा आली. हे गाणं खूप एनर्जेटिक झाल आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हे गाण नक्कीच आवडेल.”
संगीतकार प्रशांत नाकती गाण्याच्या प्रोसेसविषयी म्हणाले की, “नखरेवाली हे गावरान मराठमोळ एक लव सॉग आहे. मुलींचा निरागस आणि सोज्वळ नखरा टिपणार हे गाणं आहे. या गाण्याच चित्रीकरण नाशिकच्या एका सुंदर गावात झालेल आहे.

Alandi: विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बाबुलाल घुंडरे यांची बिनविरोध निवड

आजचा काळ मॉडर्न झाला आहे तरीपण गावकडच निरागस प्रेम वेगळ्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. गाण्यातील चारही कलाकार उत्तम डान्सर आहेत. हे गाणं ऐकल्यावर आपोआप पाय थिरकू लागतील.“

 

पुढे तो सांगतो, “दरवर्षी पाच मार्चला २०२१ पासून गाणं प्रदर्शित करत आहे. 2021 ला मी केलेलं माझी बायगो हे गाणं सगळ्यात हिट गेलं त्याचे आता १५० मिलियन व्ह्युज आहेत तर 2022 ला मी केलेलं आपलीच हवा या गाण्याला एका  दिवसात सगळ्यात जास्त व्ह्युज मिळाले होते.
त्यानंतर 2023 ला हार्टब्रेक झाला हे त्यावर्षातल माझ सगळ्यात हिट गाणं होत. आणि यावर्षी २०२४ ला मी मराठी म्युझिकवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी ‘नखरेवाली’ हे गाणं घेवून आलो आहे. या गाण्यावर प्रेक्षक मायबाप सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रेम देत आहेत. त्यांचं असच प्रेम कायम मिळो.”

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.