Talegaon Dabhade : एन के पाटील यांनी घेतला मुख्याधिकारी पदाचा पदभार

एमपीसी न्यूज – नुकत्याच झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये (Talegaon Dabhade ) तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांचीही बदली झाली. नवनियुक्त मुख्याधिकारी एन के पाटील यांनी सोमवारी (दि.24 ) पदभार घेतला. यावेळी सर्व नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. नगरपरिषदेकडून सुरू असलेली विकास कामे प्राधान्याने पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune : पुण्यात गुरुवारी चार जलकेंद्रांचा पाणी पुरवठा राहणार बंद

मावळते मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची सोलापूर येथे सहआयुक्त म्हणून बदली झालेली आहे.तर श्री पाटील हे सोलापूर हुन तळेगावला बदलून आलेले आहेत.सोमवारी सकाळीच श्री पाटील हे नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारण्यासाठी आले होते. यावेळी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, मिळकत कर व्यवस्थापक जयंत मदने,सुवर्णा काळे,रवींद्र काळोखे सह अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

या आदी श्री पाटील यांनी उमरगा, परळी वैजनाथ,देगलूर,अक्कलकोट, मोहोळ ठिकाणी मुख्याधिकारी पदाची भूमिका बजावलेली आहे. कोल्हापूर येथे काही काळ ते पोलीस निरीक्षक  होते व तुळजापूर येथे ॲग्रीकल्चर लेक्चरर ऑफिसर म्हणून काम पाहिले. तसेच सोलापूर येथे सह आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

तळेगाव शहरात नगरपरिषदेकडून चालू असलेली विकास कामे प्राधान्याने करणार (Talegaon Dabhade ) असल्याचे पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.