Maharashtra : खारघर दुर्घटनेला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार-प्रणिती शिंदे

एमपीसी न्यूज -खारघर येथे श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार ( Maharashtra ) देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले. यावेळी उष्माघाताने  14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची चौकशी व्हावी, नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आमदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेस जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस अलका राठोड आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना खारघर येथे कडक उन्हात झालेल्या सोहळ्यात उष्माघाताने 14 श्री साधकांचा हकनाक बळी गेला. चेंगराचेंगरीही झाली. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दुपारच्या तळपत्या उन्हातव20वलाख श्री साधकांची गर्दी गोळा करायची नव्हती. परंतु केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ही गर्दी गोळा केली. श्री साधकांच्या मृत्युकांडाला सर्वस्वी शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे. शिंदे-फडणवीस दोघेही या दुर्घटनेबद्दल अवाक्षरही काढत नाही.

Talegaon Dabhade : एन के पाटील यांनी घेतला मुख्याधिकारी पदाचा पदभार

असा संतापजनक सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे.खारघर दुर्घटना ही संपूर्णतः निसर्ग निर्मित नाही तर सरकारनिर्मित आहे, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला. यासंदर्भात दोन दिवसीय विधिमंडळ विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही त्यांनी   केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर स्वत:चा राजकीय प्रभाव वाढविण्याच्या हेतूने केवळ राजकीय स्वार्थापोटी शिंदे-फडणवीस सरकारने खारघर येथे भद दुपारच्या तळपत्या उन्हात महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला. खरे तर हा सोहळा पूर्वीच्या पध्दतीने एखाद्या बंदिस्त सभागृहात आयोजित करणे गरजेचे होते. परंतु केवळ निरूपणकार धर्माधिकारी यांच्या लाखो श्री साधकांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन घडविण्याचाच उद्देश सरकारने डोळ्यासमोर ठेवला होता, नंतर ही दुर्घटना अंगलट येऊ नये म्हणून आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संस्थेलाच दोष देण्यात ( Maharashtra ) येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.