Talegaon Dabhade : जागतिक रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त पवना हॉस्पिटल मध्ये रुग्ण सुरक्षा सप्ताहास प्रारंभ

एमपीसी न्यूज – जागतिक रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त पवना हॉस्पिटल (Talegaon Dabhade) सभागृहात रुग्ण सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी डॉक्टर्स,परिचारिका,रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. पवना मेडिकल फाउंडेशनने रुग्णांच्या सुरक्षित उपचार व सेवेसाठी हाती घेतलेला ‘सेफ्टी लिडर्स; सेफ्टी चॅम्पियन्स’ आणि रुग्ण-नातेवाईक सहभागाचा ‘सहयोगातून आरोग्य’ हे दोन्ही मोफत उपक्रम दिलासा देणारे असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर पवना मेडिकल फौंडेशनचे विश्वस्त डॉ. सत्यजित वाढोकर,कार्याध्यक्ष डॉ. वर्षा वाढोकर, डॉ.अनंत परांजपे,डॉ.अश्विनी परांजपे, डॉ.संजाली वाढोकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जागतिक रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त पवना हॉस्पिटल सभागृहात रुग्ण (Talegaon Dabhade) सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्त डॉक्टर्स, परिचारिका,रुग्ण,रुग्णांचे नातेवाईक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी बाळा भेगडे यांनी संवाद साधला. एकमेकांच्या समन्वयातून आरोग्य व्यवस्था अधिक उपयोगी करता येईल, असे ते म्हणाले.

Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी अन् रोईंगमध्ये भारताने जिंकले रौप्यपदक

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सारिका सोळंके यांनी ‘आरोग्याची काळजी’ याविषयावर सप्रात्यक्षिक व्याख्यान दिले. डॉ. साहेबराव टोके, डॉ. प्रशांत हिवाळे, डॉ. अक्षय धामणे आणि डॉ. संजाली वाढोकर यांनी आपापल्या तज्ज्ञता विषयांवर मार्गदर्शनपर केले.रुग्ण सुरक्षा सप्ताहाचा उद्देश आणि उपक्रमांची माहिती डॉ. वर्षा वाढोकर यांनी दिली.

डॉ. सत्यजित वाढोकर म्हणाले की, “दीर्घ आजारांच्या रुग्णावरील उपचारांची दिशा योग्य राखण्यासाठी फौंडेशनचे हे दोन्ही उपक्रम मैलाचा दगड ठरतील. ‘सहयोग समूहात’ विशिष्ट प्रकारच्या आजाराचे चार रुग्ण, नातेवाईक आणि तज्ज्ञांच्या सहभागाने उपचार अनुभवांवर चर्चा होते.  “

वैद्यकीय व्यवस्थेसमोरची सामाजिक आव्हाने आणि उपाय’, यावर डॉ. अनंत परांजपे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सेफ्टी लिडर्सच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या 44 सेफ्टी चॅम्पियन्सला बॅजेस लावून रुग्ण सुरक्षितता आणि जबाबदारीची शपथ देण्यात आली.

वैद्यकीय व्यवस्थापक डॉ.अतुल अदानिया यांनी प्रास्ताविक केले. प्रशासन प्रमुख फरीदा बेग (Talegaon Dabhade) यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.