Maval : माळवाडीचे उपसरपंच पदी पल्लवी मराठे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – माळवाडीच्या उपसरपंच रेश्मा किशोर दाभाडे (Maval) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली. यासाठी पल्लवी मराठे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाली.

उपसरपंच पदासाठी पल्लवी रोहिदास मराठे यांनी नामनिर्दशनपत्र सादर केले होते एकमेव नामनिर्दशनपत्र आल्याने पल्लवी रोहिदास मराठे यांची ग्रामपंचायत माळवाडी उपसरंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी पल्लवी संदीप दाभाडे (सरपंच)यांनी निवड जाहीर केली.

Talegaon Dabhade : जागतिक रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त पवना हॉस्पिटल मध्ये रुग्ण सुरक्षा सप्ताहास प्रारंभ

 

या प्रसंगी माजी सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच माळवाडी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते गोरख दाभाडे, बजरंग जाधव,संजय माळी, भिमाजी दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, अशोक दाभाडे, नामदेव दाभाडे,बबन आल्हाट,सुरेश शिंदे,शांताराम दाभाडे,सुदाम माळी, बाळासाहेब दाभाडे,दिलीप दाभाडे, गणेश दाभाडे,रामभाऊ राठोड, बाळासाहेब भोंगाडे,दत्तात्रय दाभाडे, शिवाजी दाभाडे,रोहिदास म्हसे आदी सर्व उपस्थित होते.गावातील माता भगिनी व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच पल्लवी मराठे म्हणाल्या की , सहकार (Maval) महर्षी माऊलीभाऊ दाभाडे व आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन गावाची विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.