Talegaon Missing News : रस्त्यावर चालण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून गेलेली व्यक्ती बेपत्ता

एमपीसी न्यूज – रस्त्यावर चालण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून गेलेली 62 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली. याबाबत संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेऊन त्यानंतर पोलिसात तक्रार दिली आहे.

जयवंत उर्फ पहिलवान बाळासाहेब एकनाथ सरोदे (वय 62, रा. म्हस्करनीस कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सुमित हनुमंत सरोदे (वय 36) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत हे फिर्यादी सुमित यांचे चुलते आहेत. ते 22 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास रस्त्यावर चालण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले. त्यानंतर ते परत घरी आले नाहीत.

जयवंत सरोदे यांची उंची पाच फूट चार इंच, चेहरा उभट, रंग सावळा, नाक सरळ, टक्कल पडलेले, केस बारीक, गळ्यात चेन, मिशी बारीक, अंगात नेसणीस पांढरा शर्ट, पांढरा पायजमा, पायात चप्पल आहे. वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास तळेगाव दाभाडे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.