Thane : चौथ्या राज्य टेबल टेनिस स्पर्धेत दिव्यांशी भौमिक व कुशल चोपडा यांना दुहेरी मुकुट; पुण्याच्या नैशा रेवसकर हिलादेखील विजेतेपद

एमपीसी न्यूज – दिव्यांशी भौमिक व कुशल चोपडा यांनी प्रत्येकी (Thane)दोन गटात विजेतेपद पटकाविले आणि राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी धमाका केला. मुलींच्या तेरा वर्षाखालील गटात पुण्याच्या नैशा रेवसकर हिला विजेतेपद मिळाले.

राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांनी सीकेपी हॉलमध्ये (Thane)या स्पर्धेचे आयोजन केले होते. कुशल चोपडा याने सतरा वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या टी एस टी संघाचा द्वितीय मानांकित खेळाडू शर्वेय सामंत याला 11-6, 11-6, 8-11, 11-8 असे पराभूत केले. नाशिकचा खेळाडू चोपडा याने याआधी या स्पर्धेतील 19 वर्षाखालील गटाचे विजेतेपद मिळवले होते.

Pimpri : एचए कंपनीमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा

मुलींच्या सतरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित दिव्यांशी भौमिक हिने पुण्याची खेळाडू आनंदीता लुणावत हिच्यावर 11-9, 11-4,11-4 अशी सरळ तीन गेम्स मध्ये मात केली आणि विजेतेपद पटकाविले. तिने या स्पर्धेतील 15 वर्षाखालील गटाचेही विजेतेपद मिळवले होते. या गटाच्या अंतिम सामन्यात तिने उत्कंठापूर्ण लढतीत ठाण्याच्या काव्या भट्ट हिचा 9-11,12-14,11-8,11-8 ,12-10 असा पराभव केला. दिव्यांशी ही मुंबईच्या टी एस टी संघाची खेळाडू आहे.

मुलींच्या तेरा वर्षाखालील गटात पुण्याच्या रेवसकर हिने अंतिम सामन्यात आरोही चाफेकर या स्थानिक खेळाडूला 11-6, 11-4,11-3 असे निष्प्रभ करीत अजिंक्यपद पटकाविले आणि आपले अग्रमानांकन सार्थ ठरविले. मुलांच्या गटात ठाण्याचा प्रतीक तुलसानी विजेता ठरला. या तृतीय मानांकित खेळाडूने मुंबईच्या टी एस टी संघाचा खेळाडू झैन शेख याच्यावर 11-3,11-3,14-12 अशी मात केली. पंधरा वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत पार्थ मगर या मुंबई महानगर जिल्हा संघाच्या खेळाडूने ठाण्याच्या ध्रुव वसईकर याचा पराभव केला. हा सामना त्याने 10-12, 11-7, 12-10, 11-8 असा जिंकला.

मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात मुंबईच्या टीएसटी संघाचा खेळाडू राघव महाजन हा विजेता ठरला. या सहाव्या मानांकित खेळाडूने अंतिम सामन्यात आर्यन अठार याच्यावर 11-0, 11-6, 11-6 अशी एकतर्फी मात केली. मुलींच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित आद्या बाहेती विजेती ठरली‌. परभणीच्या या खेळाडूने नाशिकच्या केशिका पूरकर हिचा 11-9, 11-4,11-8 असा पराभव केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.