Pune : अंगावर चिखल उडाला म्हणून टोळक्याने केली कोयत्यांनी वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज : अंगावर चिखल उडाला म्हणून टोळक्याने केली कोयत्यांनी वाहनांची तोडफोड झाली आहे. पुण्यातील (Pune) डोनजे भागातील घटना घडली आहे. इजाज मुनीर शेख यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली  असून शिवप्रसाद चोरघे यासह इतर १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : खडकवासला धरण साखळीत 41.93 टक्के,तर 12.22 टीएमसी इतका पाणी साठा जमा 

फिर्यादी हे डोणजे येथील त्याच्या घराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला थांबलेला असताना  सिंहगडाकडून येणाऱ्या दुचाकीमुळे त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यातून इजाज व दुचाकीवरील तरुणांची शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाली.

 

स्थानिकांनी मध्यस्थी करुन ही भांडणे सोडवली. दुसऱ्या दिवशी तोंडाला रुमाल बांधून, हातात कोयते घेऊन १० ते १२ जण दुचाकींवरुन आले व मोठ्या आवाजात शिवीगाळ करत एका चारचाकी आणि एका मोटारसायकलची तोडफोड केली.

 

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इजाज व त्याच्या घरातील सर्व सदस्य घाबरले होते. तसेच परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अधिक तपास सुरू आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.