PCMC : महापालिका उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी इमारत बांधणार

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी मधील आरक्षण क्र. ४० प्लॉट नं. २०१ येथे उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी इमारत बांधणे, या कामांतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणा व विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले शैक्षणिक पालकत्व

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज मंजुरी दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी
संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नाशिक फाटा येथील भारतरत्न जे. आर. डी. टाटा व मधुकर पवळे तसेच भक्ती शक्ती उड्डाणपुलावरील रंगीत दिव्यांची देखभाल व दुरूस्ती करणे, रावेत येथील रेल्वे उड्डाणपुलालगत असलेला सेवा रस्ता विकसीत करणे.

 

अनुषंगिक कामे करण्यास सुधारीत मान्यता देण्यास, केंद्र शासन पुरस्कृत अमृता २.० अभियान अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील चिखली तलावाचे पुनरूज्जीवन व सुशोभिकरण करण्यास, महानगरपालिकेच्या जलतरण तलावाकरिता ठेकेदारी पद्धतीने सुरक्षा अधिकारी तथा व्यवस्थापक घेण्यास मान्यता देण्यास, प्रभाग क्र. १८ मधील १८.०० मी. डी. पी. रस्त्यास पवना नदी वरील बटरफ्लाय पुलाची उर्वरीत स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यास, मौजे वाकी तर्फे वाडा, ता. खेड, जि. पुणे येथील भामा आसखेड धरणाजवळ गट नं. २८ पैकी मधील अँप्रोज ब्रीज व इतर अनुषंगिक कामाकरिता महानगरपालिका हद्दीबाहेरील विकास योजने व्यतिरिक्त जमीनीचे भूसंपादन करण्यास, इ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत मोशी, चऱ्होली, वडमुखवाडी, डुडूळगावमधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने देखभाल व दुरूस्ती करणे व डांबरी रस्त्याखाली गेलेले चेंबर्स रस्त्याच्या समपातळीस घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

तसेच दळवीनगर, संतोषनगर, शरदनगर, कोयनानगर, भीमशक्तीनगर, चिखली येथील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती व ताम्हाणेवस्ती, रहाटणी व पिंपरी, थेरगाव, कासारवाडी, सुदर्शननगर, श्रीधरनगर, रावेत व गुरूद्वारा, किवळे, मामुर्डी, मोरवाडी, पिंपळेनिलख गावठाण व विशालनगर, रहाटणी, दत्तवाडी, विवेकनगर, तळवडे, ज्योतीबानगर, हरगुडेवस्ती, घरकुल, कुदळवाडी, रुपीनगर, सहयोगनगर, वाल्हेकरवाडी, पिंपळे सौदागर, लिंकरोड, भाटनगर, यमुनानगर व कृष्णानगर, निगडी आदी.

प्राधिकरण, पुनावळे, कासारवाडी, चऱ्होली अंतर्गत बालाजीनगर, गवळीमाथा, खंडेवस्ती व चिखली- जाधववाडी, मोशी- बोऱ्हाडेवाडी, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळेगुरव, संत तुकाराम नगर, गंगानगर, वल्लभनगर, कासारवाडी, कुंदननगर, विशाल थिएटर परिसर, महात्मा फुलेनगर, कस्पटे वस्ती, कावेरीनगर, वेणूनगर व दत्त मंदिर परिसर, काळेवाडी, नढेनगर, कोकणेनगर, क्रांतीवीरनगर, यशवंतनगर ते गांधीनगर, खराळवाडी, नेहरूनगर व धावडेवस्ती, भगतवस्ती चक्रपाणी वसाहत, वाकड, कासारवाडी व चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत बालाजीनगर, गवळीमाथा, खंडेवस्ती व चिखली-जाधववाडी या ठिकाणी ड्रेनेज लाईन व चेंबरची देखभाल दुरूस्ती करण्यास मान्यता देण्यात आली.

चिखली येथील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती व ताम्हाणेवस्ती, सोनावणे वस्ती, रामदासनगर, पाटीलनगर, मोरेवस्ती, रावेत व गुरूद्वारा, तळवडे, ज्योतिबानगर, रूपीनगर, सहयोगनगर, हरगुडेवस्ती, घरकुल, कुदळवाडी, शरदनगर, कोयनानगर, भीमशक्तीनगर परिसरात व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार भुयारी गटर नलिका टाकणे व दुरूस्ती करण्यास मान्यता देण्यात आली.

तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) समुदायासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यास, पदव्युत्तर संस्था वायसीएम रुग्णालयाकरिता एकत्रित तात्पुरत्या स्वरुपात कनिष्ठ निवासी व वैद्यकीय अधिकारी या पदावर दिलेल्या नियुक्तीस कार्योत्तर मान्यता देणेबाबत, प्रभाग क्र. ६ मध्ये धावडे वस्ती, भगत वस्ती, गुळवे वस्ती, चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती, सद्गुरूनगर व परिसरात खड्डे, चर व रस्त्यांची दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मुकाई चौक ते चिखली स्पाईन रस्ता विकसित करणे व अनुषंगिक कामे करणे, या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करण्यास, प्रभाग क्र. १९ मध्ये मुख्य व अंतर्गत डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करणेबाबत, प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण भागातील मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणेबाबत, महानगरपालिका दवाखाना/ रुग्णालयांकरिता डबल डोम सेलिंग ओटी लाईट हे उपकरण खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) सर्व रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व तत्सम योजना अंमलबजावणीकामी एजन्सी नेमणुक करण्यास मान्यता देण्यात आली. सावित्रीबाई फुले अकादमी करीता पुस्तके खरेदी करण्यास, सोशल इम्पॅक्ट करणे बाँडचे अंमलबजावणीकामी इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पॉप्यूलेशन सायन्सेस, मुंबई यांची नेमणूक करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

निगडी, सेक्टर २२ भागातील आवश्यकतेनुसार भुयारी गटर नलिका टाकणे व दुरूस्ती करणेबाबत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात किडनी केअर डायलिसीस सेंटर करिता जागा उपलब्ध करून देणेबाबत येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेतील मौजे तळवडे येथील इंद्रायणी नदीलगताच १२ मी व ३० मी रुंदीच्या रस्त्याने बाधीत जमिनीचे भूसंपादन करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. अनधिकृत (होर्डिंग्ज) जाहिरात फलक निष्कासित करणेसाठी अतिरिक्त जादा एजन्सीची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.

इ प्रभागातील व्यायाम शाळा, बॅडमिंटन हॉल इ. क्रिडा विषयक सुविधांची स्थापत्य विषयक कामे करणेबाबत, आपत्ती व्यवस्थापन करिता पावसाळ्यामध्ये साचलेले पाणी उपसा करण्यासाठी ट्रॉलीवर बसवलेले पंप खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.