PCMC: 18 मीटर पुढील रस्त्यांच्या यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी सल्लागार समिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pcmc) शहरातील 18 मीटर आणि त्यापुढील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी तांत्रीक सल्लागार समिती गठीत करण्यात येणार आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत विविध विषयांना मान्यता दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

Nigdi : उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळा झेंडा दाखवणाऱ्यावर गुन्हा दाखल

स्थापत्य प्रकल्प विभागाकडील कामाच्या तरतुदीमध्ये वाढ, ब प्रभागामध्ये क्रीडा विषयक सुविधांची स्थापत्य विषयक कामे करणे, इ प्रभागामध्ये क्रीडा विषयक सुविधांची स्थापत्य विषयक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता एकत्रित मानधनावर शिक्षक नेमणुकीस मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या (Pcmc) पशुवैद्यकीय विभागांतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने व प्राणिसंग्रालय पशुवैद्यक, क्यूरेटर व पशुवैद्यकीय अधिकारी या अभिनामाचे पदावर दरमहा एकत्रित मानधनावर हंगामी (तात्पुरत्या ) स्वरुपात 3 महिने कालावधीसाठी मुदतवाढ देऊन नियुक्ती तथा मानधनासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

चिखली येथे नव्याने होणाऱ्या टाऊन हॉलकरीता उच्चदाब वीजपुरवठा घेणेकामी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांना अनामत रक्कम, करारनामा व वीजपर्यवेक्षक शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली. जुनी निकामी झालेली 120 वाहने विक्री करण्यास व त्यातून येणारी रक्कम महापालिका (Pcmc) कोषागारात भरून घेण्यास मान्यता देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.