Pimpri – वल्लभनगर आगारातील रस्त्याचे काम संथ गतीने

एमपीसी न्यूज- वल्लभनगर एसटी आगारातील रस्त्याचे काम आतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे, प्रवाशांना प्रवास करताना त्रास होत आहे. पिंपरी (Pimpri) येथील वल्लभनगर हे एकमेव आगार असल्यामुळे या ठिकाणा वाहनांची गर्दी होते. मात्र, आगारातील काम संथ गतीने सुरु असल्यामुळे वाहने पार्क कुठे करायची असा प्रश्न निमार्ण झाला आहे.

वल्लभनगर आगारात (Pimpri) दररोज मोठया प्रमाणात बस पार्क केल्या जातात. त्यामध्ये 300 ते 400 बस पार्क केल्याचे प्रमाण आहे. या आगारात परराज्यातुन मुक्कामासाठी आलेल्या बस थांबलेल्या असतात. मुक्कामासाठी थांबलेल्या बस तसेच सुटलेल्या बस यांना मार्ग काढण्यासाठी चालकाला कसरत करावी लागते.

PCMC: 18 मीटर पुढील रस्त्यांच्या यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी सल्लागार समिती

त्यामध्ये आगारातील आतील रस्त्यांचे काम सुरु आहे. त्यामुळे आगारात बस चालकांना बस पार्क करता येत नसुन त्या ठिकाणी वर्कशाॅपच्या गाडया पार्क केल्या जात आहेत. यांचा त्रास चालकाल होत आहे.

या आगारात वाकडेवाडी, स्वारगेट बसगाडया मुक्कामासाठी येत असतात. तसेच आगारात बाहेरील गाडया देखील पार्क केल्या जातात. त्यामुळे आगारात गर्दी होते. रात्रीच्या वेळेस प्रवास करताना प्रवाशाना अपघाताची शक्यता निर्माण अपघात होऊ शकते . त्यामुळे येथील काम वेगात करावे असे, मत प्रवाशी व्यक्त करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.