Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले शैक्षणिक पालकत्व

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा (Pune) तर्फे रविवारी (दि.25) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

कर्वेनगर येथे झालेल्या या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून IT व्यवसायातील तज्ज्ञ,अग्रगण्य नाव डॉ. दीपक शिकारपूर, विजय शेकदार, डॉ. प्रशांत मंझिरे, विश्राम देव, सरस्वती जोशी हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी, विशेषतः जपानी भाषा शिकण्याचे फायदे व त्याद्वारे जपानमध्ये मिळणारी परदेशी नोकरीसाठी या विषयावर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

घरची अत्यंत गरिबी, काहींच्या घरातील कर्त्या कमावत्या पुरुषाचे झालेले निधन, कोरोना काळात गेलेली नोकरी, हातावरचे पोट अशा प्रतिकूल परिस्थितीत जगत असलेले खडतर आयुष्य, परंतु शिकण्याची जिद्द, जबाबदारीची जाणीव, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची सचोटीची भावना अशा समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांची 2023 सालची शाळा, कॉलेजची शैक्षणिक फी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मार्फत करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी केले. ऋचा पाठक (Pune) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केतकी कुलकर्णी, कमलेश जोशी, राहुल जोशी, अमोघ पाठक यांचा सहभाग होता.

Talegaon : तळेगावमधून चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक; किशोर आवारे खुनाच्या बदल्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा अंदाज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.