Pune : संघटन सामर्थ्यातून स्वत: समाज उन्नतीसाठी करण्याची भावना ब्राह्मण समाजामध्ये दिसून येते – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – प्रत्येक गोष्टीत सरकारवर (Pune) अवलंबून राहाण्यापेक्षा संघटन सामर्थ्यातून स्वत: समाज उन्नतीसाठी कार्य करू शकतो, हि भावना ब्राह्मण समाजामध्ये दिसून येते, असे मत महाराष्ट्राचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि.25) व्यक्त केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, ब्रह्मोद्योग आघाडी यांच्या वतीने ब्रह्मोद्योग स्टार्ट अप कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यातून 462 पेक्षा जास्त उद्योजकांनी प्रत्यक्ष व 1 हजार 500 उद्योजकांनी ऑनलाईन भाग घेतला.

या वेळी व्यासपीठावर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी, सत्यजित कुलकर्णी अध्यक्ष, उद्योजकता विकास, राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत धडफळे, जिल्हाध्यक्ष मंदार रेडे आदी उपस्थित होते. अर्जुन देशपांडे (आरोग्य), अभिषेक जोशी (उद्योग), मयुरी अत्रे (संगीत), विवान कारुळकर (साहित्य व विज्ञान) आणि अक्षय भंडारी (तंत्रज्ञान) यांनी अल्पवयात आपल्या क्षेत्रात सिद्ध केलेल्या कर्तृत्वाबद्दल त्यांना युवा प्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात दिवसभरात सुनील देवधर भाजपा, चितळे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश चितळे, बेलराइझ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका सुप्रिया बडवे, पराग मिल्कचे सरव्यवस्थापक शशांक जोशी, उद्योजक संतोष जोशी, प्रसन्न देशपांडे, अभि ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र जोशी, अर्जुन देशपांडे (जेनेरिक आधार), उमेश दशरथी (उपाध्यक्ष – देवगिरी सहकारी बँक) यासारख्या उद्योजकांनी तसेच डॉ प्रदीप बावडेकर यासारख्या शिक्षणतज्ञांनी, साहसवित्त भांडवलदार मंदार जोशी ( वेंचर कॅपिटलिस्ट), गणेश निमकर, देवगिरी बँकेच्या (Pune) रजनी क्षिरसागर या अर्थतज्ज्ञांनी त्याचप्रमाणे एमआयटीच्या प्राध्यापिका रश्मी पेठे व जिल्हा उद्योग केंद्राचे पंकज शिंदे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Pune:सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील 2 शाळांना सनातनच्या ग्रंथांचे विनामूल्य वितरण 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत धडफळे, प्रसाद गिजरे, मुकुंद कुलकर्णी, अमोघ पाठक, कमलेश जोशी, ऋचा पाठक, सुशांत राजपाठक, रसिका जोशी, केतकी कुलकर्णी, शिल्पा महाजनी, विवेक खीरवडकर , सुहास पानसरे, विकास कुलकर्णी, वृषाली शेकदार, विजय शेकदार, राजीव देशपांडे, संजय ठाकूर-देसाई, माधुरी देशपांडे, किरण प्रभुणे, संगीता कुलकर्णी , मंजुषा कुलकर्णी, सुचेता कुलकर्णी, लीना ढेकणे, नेहा इंगळे, भालचंद्र जोशी, किरण प्रभुणे, डॉ. सुनिता भोळे, सचिन नाखरे, विराज फाटक, सचिन कुलकर्णी आणि राजेंद्र पुराणिक, आकांक्षा देशपांडे, अनिता काटे, अमृता मेढेकर, सुरेखा पारवेकर, अश्विनी औरसंग, राजन बुडुख, दिलीप कुलकर्णी, सुषमा वैद्य, सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे, ध्रुव कुलकर्णी, तसेच सानिका खरे, वंदना धर्माधिकारी, वेदिका सदावर्ते, मयुरेश चंद्रचूड, आकांक्षा देशपांडे, चेतन पुराणिक, वेल्हा चे दिलीप फडके, राजेश सहस्त्रबुद्धे, सुहास पानसरे आणि टीम या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी प्रास्ताविक केले, स्मिता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उद्योजकता विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यजित कुलकर्णी यांनी आगामी कार्यक्रमाची माहिती सांगितली, जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.