Talegaon : तळेगावमधून चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक; किशोर आवारे खुनाच्या बदल्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा अंदाज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Talegaon) दरोडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांनी दोघांना चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह रविवारी (दि.25) अटक केली आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आरोपी हे तळेगाव येथील किशोर आवारे यांच्या खूनाचा बदल्याच्या तयारीत होते.

प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे) आणि शरद मुरलीधर साळवे (वय 30, रा. धनगर बाबा मंदिराच्या मागे काळेवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, यांना शस्त्र पुरवणाऱ्या तिघांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर मिळाली सराईत आरोपी प्रमोद सांडभोर हा रविवारी तळेगाव दाभाडे बस स्टॅन्डजवळ शस्त्रासह येवून ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. अशी खबर मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी बस स्टँड परिसरात सापळा लावला.

आरोपी हे निळ्या रंगाच्या अल्टो कारमधून खाली उतरले. त्यांच्या कंबरेला पिस्टल होत्.. पोलिसांचा सुगावा लागताच ते दोघे वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता दोन पिस्टल, 4 जिवंत काडसुते मिळाली तर कारची तपासणी केली असता त्यात दोन आणखी पिस्टल व 10 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.

पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 60 हजारांची शस्त्रे व 1 लाख रुपयांची गाडी असा एकूण 2 लोख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

AAP: आरटीई रकमेची परिपूर्ती तातडीने करा, गरीब मुलांना शाळा शिकू द्या!

दोन्ही अटक आरोपी हे सराईत असून त्यांनी मध्यप्रदेशमधून इतर दोघांकडून पिस्टल व काडतुसे आणली होती. सांडभोर याच्या विरोधात खून, खूनाचा प्रयत्न असे 8 गुन्हे दाखल आहेत, तर साळवी याच्या विरोधात खून मारामारी, बलात्कार असे तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांच्या अंदाजानुसार ते मोठा कट रचत होते. जनसेवा विकास समितीचे (Talegaon) संस्थापक अध्यक्ष दिवंगत किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कटामध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समोर आले आहे. आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम करत आहेत.

हि कारवाई दरोडी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश हिंगे, विनोद वीर, सुमित देवकर, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रवीण माने, राजेश कौशल्य, राहूल खरगे, समिर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे व अमर कदम यांनी केली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पथकाला बक्षिस देखील जाहीर केले आहे.

मात्र या साऱ्या प्रकारानंतर तळेगाव परिसरात पुन्हा खळबळ पसरली असून आरोपी नेमके कोणाचा खून करून बदला घेणार होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील पोलीस आयुक्तालयात येऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. आता साऱ्या परिस्थितीला पिंपरी-चिंचवड पोलीस कसे सामोरे जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.