Alandi : स्वतः चा जीव धोक्यात घालून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी वाचवले महिलेचे प्राण

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात दोन पोलिसांच्या माणुसकीचे उदाहरण आज पाहायला मिळाले. स्वतःचा जीव धोक्यात घालून या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पालखी रथाखाली आलेल्या महिलेला जीवदान दिले.

दिघी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी परतीच्या बंदोबस्तामध्ये पालखी थोरल्या पादुका मंदिराच्या पुढे आल्यावर एक महिला पालखी रथाचे दर्शन घेण्याच्या घाई घाईत पालखी रथाच्या खाली चाललेली दिसली.

दिघी पोलीस स्टेशनचे अंमलदार रवींद्र संतराम पाठे, पोलीस शिपाई राहुल सुरेश कारंडे ,आर सी पी प्लाटून, पिंपरी-चिंचवड यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेस वाचवीत असताना रवींद्र पाठे यांचा डावा पाय रथाच्या चाकाखाली जाऊन फॅक्चर झाला तर राहुल कारांडे जखमी झाले आहेत .

त्यांच्यावर के के हॉस्पिटल वडमुख वाडी येथे उपचार चालू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.