Chikhali : चिखली-तळवडेतील रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी गुरुवार, शुक्रवारी शिबिर

एमपीसी न्यूज – चिखली व तळवडे भागातील 7 रस्त्यांच्या (Chikhali) आगाऊ ताब्यासाठी महापालिका नगररचना विभागाकडून 26, 27 ऑक्टोबर 2023 रोजी शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.

सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चिखली गावठाणमधील मनपा शाळा मुले व मुली तसेच तळवडे गावठाणमधील मनपा शाळा मुले व मुली येथे शिबिराचे आयोजन केले आहे. मौजे चिखली व तळवडे येथील मंजूर विकास योजनेतील खालीलप्रमाणे 7 रस्त्यांच्या आगाऊ ताब्याची कार्यवाही भूसंपादन कायदा 2013 अन्वये जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत सुरू आहे. तर काही रस्त्यांची भूसंपादनाची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.

BJP : तरुणांना शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्याचा महाविकास आघाडीचा कट – शंकर जगताप

प्रशासनाचे आवाहन…

रस्ता बाधित मिळकतधारकांना पिंपरी-चिंचवउ महापालिकेकडे टी.डी.आर. / एफ.एस.आय. चे बदल्यात आगाउ ताबा देणेसाठी 7/12 उतारा व मोजणी झाली असल्यास मोजणी नकाशा सोबत आणावा व रु. 100/- प्रपत्र शुल्क भरावेत.

आपली जागा रस्त्याने बाधित होत असल्याची खात्री झाल्यानंतर जागेवरच प्रपत्र ‘अ’ व ‘ब’ देणेत येईल. आपला टी.डी.आर./ एफ.एस.आय. चा रितसर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार टी.डी.आर./ एफ.एस.आय. मनपाकडून देण्यात येईल.

भूसंपादन कायद्यान्वये निवाडा जाहीर झाल्यास टी.डी.आर. / एफ.एस.आय. ला पर्याय उपलब्ध राहणार नाही. त्यानंतर केवळ (Chikhali) भूसंपादन कायद्यानुसार मिळणारा मोबदला देय होईल.

चिखलीतील रस्तेबाधित मिळकतधारकांनी बनपट्टे 9922502240 आणि तळवडेतील रस्तेबाधित मिळकतधारकांनी गवळी 9423506531 यांना संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.