Today’s Horoscope 08 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 08 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – रविवार.

08-01-2023

शुभाशुभ विचार- सामान्य दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००. 

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य. 

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी)  

पूर्वी कामाच्या व्यापात रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालावेच लागेल. आज कुटुंबीयांना आपला जास्तीत जास्त वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

वृषभ (शुभ रंग- मोतिया  )

आजचा तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाईल. महत्त्वाच्या कार्यालयीन कामासाठी भटकंती होईल. आज गृहिणींचा शेजारी सलोखा वाढेल.  घराबाहेर वादविवाद टाळा.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व गुण कमी येतील. गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपली मते पटवून देऊ शकाल. आज आर्थिक बाजू भक्कम असेल. शेजाऱ्यांशी खटकण्याची शक्यता.

कर्क (शुभ रंग- पांढरा )

आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. जशास तसे या धोरणाने वागा. ऐकावे जनाचे व करावे मनाचे या तत्त्वाने वागा. दूरच्या प्रवासात खोळंबा होईल.

सिंह (शुभ रंग- मोरपंखी )

आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागणार आहेत. दूरच्या प्रवासात मौल्यवान ऐवज सांभाळा. फार सडेतोड बोलल्याने काही हितचिंतक दुरावतील. गोड बोलून आज स्वार्थ साधून घेणे हिताचे राहील.

Alandi News : पौष पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबा देवाचा लग्न सोहळा उत्साहात

कन्या ( शुभ रंग- चंदेरी )

आज तुम्ही जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील. काही रखडलेले उपक्रम मार्गी लागतील. छान दिवस.

तूळ ( शुभ रंग- निळा )

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक आदबीने वागतील आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम )

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत आज अवश्य घ्या. कायद्याची चौकट मोडू नका. अडचणीत याल. वाहतुकीचे नियम पाळा.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी )

नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही तुम्हाला दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकावी लागतील. गाडी चालवताना स्टंट नकोत. आपल्या सुरक्षेची काळजी घ्या.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )

व्यवसायात आज तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी )

काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मीन -(शुभ रंग – जांभळा )

आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन कराल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.