Pune Crime news : 10.52 लाख रुपयांचा ई-सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज- गुन्हे शाखा युनिट दोन पुणे शहर यांनी शाळा तसेच महाविद्यालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ई- सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या सर्रास वापरावर मोठी कारवाई  करून 9 इसमांच्याकडून 10.52 लाख रुपयांचा ई-सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचा (Pune Crime news) मुद्देमाल जप्त केला आहे.

 

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर ई- सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असून त्यावर वरिष्ठांकडून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सहाय्य्क पोलीस निरीक्षक विशाल मोहिते व पोलीस अंमलदार यांची टीम युनिट दोनच्या हद्दीत भारती विद्यापीठ, लष्कर व कोरेगाव पार्क हद्दीत तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात नऊ पान टपरी/ दुकानावर छापा टाकून कारवाई केली असता तेथे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबत निष्पन्न झाले. त्याबाबत पंचनामा करून भारती विद्यापीठ, लष्कर व कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण नऊ ठिकाणी कारवाई करून तंबाखूजन्य ( ई -सिगारेट ) उत्पादन अधिनियम 2003 च्या कलम 6 (ब), 24 अन्वये कायदेशीर कारवाई करून एकूण 10.52 लाख रुपयांचा मुद्देमाल पंचनामे करून जप्त करण्यात आलेला आहे.

Today’s Horoscope 08 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार पोलीस, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1, गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट 2 पुणे शहर (Pune Crime news), सहाय्य्क पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अंमलदार विनोद चव्हाण, संजय जाधव, मोहसीन शेख, गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, समीर पटेल, कादिर शेख, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, रेश्मा करंडे, नागनाथ राख यांच्या पथकाने केलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.