Pune news: ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023’ ला सुरुवात

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने आयोजित  33 व्या  महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023  सुरू झाली आहे.ही स्पर्धा यावर्षी पुणे शहरातील एस आर पी एफ ग्रुप एक व दोन यांच्या मैदानावर आयोजित  करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये अमरावती , औरंगाबाद ,नांदेड,  कोल्हापूर , नवी मुंबई, मीरा भाईंदर , कोकण प्रक्षेत्र,  मुंबई शहर,  नागपूर शहर, नागपूर परिक्षेत्र,  नाशिक , पुणे शहर व पिंपरी चिंचवड, रेल्वे परिक्षेत्र,  एसआरपीएफ परिक्षेत्र, ठाणे शहर,  ट्रेनिंग डायरेक्ट रेट अशा एकूण 13 संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये स्विमिंग, हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, रेसलिंग, जुडो, बॉक्सिंग, तायक्वांदो, कबड्डी, बॉडी बिल्डिंग, पावर लिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, क्रॉस कंट्री, बास्केटबॉल, खो-खो, हॉलीबॉल अशा एकूण 18 खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

Pune Crime news : 10.52 लाख रुपयांचा ई-सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल जप्त

7 जानेवारी 2023 रोजी एस आर पी एफ ग्रुप वानवडी पुणे या ठिकाणी उशु, कुस्ती व बॉक्सिंग या स्पर्धांना सुरुवात झाली आहे.

आज 8 जानेवारी 2023 रोजी एसआरपीएफ ग्रुप वानवडी पुणे या ठिकाणी रेसलिंग, उशु, पावर लिफ्टिंग बॉक्सिंग या स्पर्धा होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.