Today’s Horoscope 14 November 2022 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 November 2022
वार – सोमवार.
14.11.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – पुनर्वसू 13.15 पर्यंत नंतर पुष्य.
चंद्र राशी – कर्क.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )
तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आज घरात सजनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. आज गृहसौख्याचा दिवस.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )
धनस्थानातील चंद्र भ्रमण तुमची आर्थिक आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस आहे

कर्क (शुभ रंग- पांढरा.)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळावे तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )
आज काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभाने आकर्षित करतील. आज तुम्ही थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
आज हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडेच तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीने ही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी मनापासून खर्च कराल.

तूळ ( शुभ रंग- निळा)
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के असेल नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती आध्यात्मिक होणार आहेत.

धनु- (शुभ रंग- चंदेरी)
जे चाललंय ते बर चाललय म्हणा. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरून चालणार नाही. धाडसाची कामे आज टाळलेलीच बरी आज सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो.

मकर ( शुभ रंग- जांभळा )
वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील आज उगीच इतरांच्या भानगडीत पडू नका.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बाढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्कीच मिळेल.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी अशी एखादी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.