Khopoli Accident news: पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात 3 गंभीर व 7 किरकोळ जखमी

एमपीसी न्यूज: पुणे- मुंबई एक्स्प्रेसवे वर ट्रक उलटल्याने प्रवासी बसला धडकून काल रविवारी रात्री झालेल्या अपघातात 3 गंभीर व 7 किरकोळ जखमी झाले आहेत.

महेश चव्हाण, पोलीस उप निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, बोरघाट यांनी माहिती दिली की काल रात्री 8.20 वा मुंबई – पुणे लेनवर किमी 40.600 येथे अपघात झाला होता व त्या अपघाताची माहिती मुंबई व ठाणे नियंत्रण कक्ष यांना देण्यात आली होती.

चालक नावेद खान, रा. नागपूर हा ट्रक नं MH-40-BG- 3457 मध्ये भंगार माल घेऊन मुंबई कडे जात असताना त्या ठिकाणी पोहोचल्यावर ब्रेक फेल झाला. तो मुंबई कडे जाणाऱ्या लेनवरून तो ट्रक पुण्याकडे जाणाऱ्या लेन वरून जाणाऱ्या प्रवासी बस KA-41-D-1471 हिच्या उजव्या बाजू कडील भागावर जाऊन धडकून पलटी होऊन पडला.

Pune news : पायाभूत सुविधांचे वृद्धिकरण – मध्य रेल्वेवर 2022-23 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक दुप्पट मल्टीट्रॅकिंग

ह्या बस मधील दोन प्रवासी (नाव पत्ता माहित नाही) यांना गंभीर दुखापत झालेली असून त्यांना IRB च्या ॲम्बुलन्स ने अधिक उपचाराकरिता खोपोली नगर पालिकेच्या हॉस्पिटल येथे घेऊन गेलेले आहे.

अपघातामधील व्ही आर एल च्या बस मध्ये एकूण 25 ते 30 प्रवासी होते. सदर प्रवासी मध्ये दोन गंभीर जखमी व सात किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी प्रवासींना IRB च्या ॲम्बुलन्स ने अधिक उपचाराकरिता खोपोली नगर पालिकेच्या हॉस्पिटल येथे घेऊन गेलेले आहे. साधी दुखापत असलेल्या प्रवासांना जागेवर प्रथमोपचार करण्यात आलेले आहेत.

अपघातातील ट्रक व बस यांना IRB च्या क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊ वाहतूक सुरळीत करून वाहतुकीसाठी दोन लेन रात्री 9.15 वा सुरू करण्यात आलेले आहेत.

अपघाताबाबतची माहिती खोपोली पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.