Pune news : पायाभूत सुविधांचे वृद्धिकरण – मध्य रेल्वेवर 2022-23 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक दुप्पट मल्टीट्रॅकिंग

एमपीसी न्यूज : मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा मजबूत करण्याकरीता अनेक पावले उचलली आहेत तसेच ग्राहक आणि प्रवाशांच्या प्रवासी सोयी सुविधा असो किंवा नवीन लाईन,(Pune news) विद्युतीकरण किंवा दुहेरीकरण अशा विविध उपाययोजना राबविल्या आहेत.

एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत आतापर्यंत, मध्य रेल्वेने कोणत्याही वर्षातील 158 किलोमीटर दुहेरीकरण, मल्टीट्रॅकिंगचा विक्रम पूर्ण केला आहे. 158 किलोमीटरमध्ये नरखेड- कळंभा, जळगाव- सिरसोली, सिरसोली- माहेजी, माहेजी- पाचोरा 3 री लाईन, भिगवण – वाशिंबे, अंकाई किल्ला- मनमाड, राजेवाडी- जेजुरी- दौंडज, काष्टी- बेलवंडी, वाल्हा- निरा, वर्धा – चितोडा दुसरी कॉर्ड लाइन यांचे दुहेरीकरण याचा समावेश आहे.

Vegetable prices : गवार, टोमॅटो, फ्लॅावर, मटारच्या भावात घट

अनिल कुमार लाहोटी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले की, क्षमता वाढल्याने मध्य रेल्वेला वाहतूक कोंडीवर मात करण्यात मदत होईल आणि ट्रेन सुरळीत चालण्यास मदत होईल. संरक्षेवर तसेच प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करून आम्ही रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्याचे आणि रेल्वेचे नेटवर्क भविष्याकरीता तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

वर्ष 2021-22 मध्ये, मध्य रेल्वेने एकूण 177.11 किमीची तत्कालीन सर्वोच्च पायाभूत सुविधा संवर्धन पूर्ण केले, ज्यात नवीन लाईन (31 किमी), दुहेरीकरण (74.79 किमी), तिसरी/चौथी लाईन (53.52किमी) आणि 5वी/6वी मार्गिका (18 किमी म्हणजे 9 किमीची प्रत्येक लाईन) समाविष्ट आहेत. तसेच 339 रूट किमी (मार्ग किमी) चे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.