Vegetable prices : गवार, टोमॅटो, फ्लॅावर, मटारच्या भावात घट

एमपीसी न्यूज – गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी गवार, टोमॅटो, प्लॉवर, शिमला मिरची, मटारच्या भावात घट झाली. तर, अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. (Vegetable prices) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश
आणि तामिळनाडूतून शेवगा 3 टेम्पो, कर्नाटक येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, राजस्थानातून 2 टेम्पो गाजर, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 टेम्पो घेवडा, मध्यप्रदेशातून 6 टेम्पो आणि हिमाचल प्रदेशातून 1 टेम्पो मटारची आवक झाली आहे़

तर मध्य प्रदेशातून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारा येथून सुमारे 1400 ते 1500 पोती, टोमॅटो अकरा ते बारा हजार क्रेटस, गवार 7 ते 8 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, मटार 20 ते 25 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, कांदा 75 ते 80 ट्रक,

आग्रा, इंदोर आणि पुणे विभागातून बटाटा 40 ट्रक इतकी आवक झाली, असे आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : 150-280, बटाटा : 170-230. लसूण : 100-400, आले सातारी : 150-350, भेंडी : 250-350, गवार : गावरान व सुरती 200-300, टोमॅटो : 80-100, दोडका : 200-250, हिरवी मिरची : 250-300, दुधी भोपळा : 100-150, चवळी : 200-250, कारली : हिरवी 250-300, पांढरी :200-
250, पापडी : 350-400, पडवळ : 200-250,(Vegetable prices) काकडी : 120-160, फ्लॉवर : 80-100, कोबी : 100-150, वांगी : 250-350, डिंगरी : 200-250, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 300-400, तोंडली : कळी 350-400, जाड : 150-200, शेवगा : 1000-1200, गाजर : 200-400, वालवर : 350-450, बीट : 280-300, घेवडा : 250-350, कोहळा : 100-150, आर्वी:200-250, घोसावळे : 200-250, ढेमसे : 300-350, भुईमुग शेंग : 500-550, मटार : स्थानिक: 750- 900, परराज्य: 750-900, पावटा : 400-450, तांबडा भोपळा : 100-150, कैरी तोतापूरी: 700, सुरण : 200-250, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

Blood donation : गुजर स्नेहवर्धिनी पुणे तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 80 बाटल्या रक्त संकलित

 

कोथींबीर मेथी, कांदापात, पालकचे दर उतरले

मार्केटयार्डात आठवड्याच्या तुलनेत रविवारी कोथींबीर मेथी, कांदापात, मुळे व पालकचे दर उतरले. अंबाडी आाणि चवळईच्या भावात वाढ झाली असून अन्य सर्वच पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान कोथींबीरीच्या दीड लाख गड्ड्यांची आवक झाली (Vegetable prices) तर मेथीच्या 50 हजार गड्ड्यांची आवक झाली़ कोथींबीर आणि कांदापातीच्या भावात गेल्या आठवड्यापेक्षा रविवारी गड्डीमागे दोन रुपयांची घट झाली आहे तसेच मेथी आणि मुळे प्रत्येकी तीन रुपयांची घट झाली आहे़ तर अंबाडी आणि चवळईच्या भावात गड्डीमागे प्रत्येकी एक रुपयांची वाढ झाली आहे़.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : 300-1000, मेथी : 600-1200, शेपू :

300-800, कांदापात : 600-1000, चाकवत : 400-700, करडई : 400-600

पुदीना : 200-600, अंबाडी : 500-700, मुळे : 800-1200, राजगिरा : 400-600,

चुका : 500-1000, चवळई : 400-700, पालक : 800-1200.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.