Expressway Block : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवस ब्लॉक

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवार (दि. 3 April ) आणि गुरुवारी (दि. 4 April ) दुपारी बारा ते दोन या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे. द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम या कालावधीत केले जाणार आहे.

Maharashtra News : राज्यात सुमारे 22 हजार कैद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर किमी 93/900 येथे 3 व 4 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2 या दरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. गॅन्ट्री बसविताना मुंबई व पुणे वाहिनीवरील (Expressway Block) सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक (Expressway Block) पूर्णतः बंद राहील.
द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे ब्रिज वरून जुना मुंबई – पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका किमी 55.000 वरुन (लोणावळा एक्झीट) येथून जुना मुंबई -पुणे मार्गावरुन पुणेच्या दिशेने मार्गस्थ होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.