Pune Railway : मार्च महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटी चौदा लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारी 2024 मध्ये तिकीट तपासणीदरम्यान 26 हजार 374 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 2 कोटी 14 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. 
रेल्वे प्रशासनाकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईची  मोहीम  सातत्याने सुरू आहे. मार्च महिन्यात 26 हजार 374 प्रवासी विना तिकीट प्रवास (Pune Railway) करताना आढळून आले. त्यांच्याकडून 2 कोटी 14 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच 8 हजार 546 प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी 51 लाख 67 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 233 प्रवाशांकडून 34 हजार 20 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Railway Accident : रेल्वेतून पडल्याने दोघांचा मृत्यू

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक (Pune Railway) इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे कायद्यांतर्गत विना तिकीट प्रवास केल्यास दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो म्हणून प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.