साहेबांना मुलगा झाला, मोफत साडी अन् पैसे देऊ, फसवणुकीचा नवा ट्रेंड

एमपीसी न्यूज : फसवणूक करणारी नवीन टोळी आता पुण्याच्या रस्त्यावर सक्रिय झाली आहे. आमच्या साहेबाना मुलगा झाला.. मोफत साडी आणि पैसे देऊ असे म्हणत ज्येष्ठ महिलांना लुबाडण्याचे घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. अशाप्रकारे लुबाडण्याऱ्या या टोळींचा शहरभर धुमाकूळ सुरू झाला आहे. नुकतीच एक घटना वारजेत घडली असून, ज्येष्ठ महिलेकडील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पसार झाले आहेत.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार वारजेतील ओकांर कॉलनी लेन नंबर ४ येथील पोळ इमारतीत जात होत्या. जिन्याने घरीकडे जाताना दोन भामटे त्यांच्याजवळ आले. त्यांनी साहेबांना मुलगा झालाय. ते गरीब महिलांना मोफत साड्या व पैसे वाटप करत आहेत. चला तुम्हाला पण देतो अशी बतावणी केली. पण, अंगावरील दागिने काढून कपड्यात ठेवण्यास सांगितले. त्यांच्याकडील कपडे सोने ठेवण्यास दिले. सोने या कपड्यात ठेवताच दोघांनी तुम्ही इथच बसा साहेब येतील व साड्या आणि पैसे देतील असे सांगितले. त्यानंतर हे दोघे पसार झाले. अनेक वेळ वाट पाहून देखील कोणीच न आल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Khopoli Accident news: पुणे- मुंबई एक्स्प्रेसवे वर भंगार ट्रक पलटी होऊन प्रवासी बसला धडकल्याने 3 गंभीर व 7 किरकोळ जखमी

शहरात सध्या अशा रितीने फसवणूककरून दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वारजे माळवाडी, येरवडा, हडपसर, भारती विद्यापीठ यासह विविध भागात या घटना घडत आहेत. टोळीत तीन जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. भामटे ज्येष्ठ महिलांना टार्गेट करतात. महिला एकटीच असल्याची खात्री होताच त्यांना गाठतात. त्यांना सोन्याच्या कलरचे बिस्कीट दाखवितात. ते देण्यासाठी म्हणून त्यांच्याकडून दागिने घेऊन त्यांना बनावट सोन्याचे बिस्कीट दिले जाते. तर, अनेक ज्येष्ठ महिलांना आमच्या साहेबांना खूप वर्षानंतर मुलगा झाला आहे. त्यामुळे ते मोफत साड्या व पैसे वाटत आहेत. तुम्हाला देखील आम्ही मिळवून देऊ अशी बतावणी करतात. त्यांचा विश्वास संपादनकरून त्यांना दागिने मात्र, कपड्यात काढून ठेवण्यास सांगितले जाते. दागिने काढले तरच तुम्हाला साडी व पैसे मिळतील असा विश्वास त्यांच्यात निर्माण करतात. त्यानंतर त्यांचे सोने मिळताच हातचालाकीकरून टोळी तेथून पोबारा करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.