Khopoli Accident News: पुणे- मुंबई एक्सप्रेसवे अपघातबाबत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुणे- मुंबई एक्सप्रेसवे अपघातबाबत ट्रक चालकाविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती अमोल धाईगुडे, पोलीस नाईक, खोपोली पोलीस ठाणे यांनी दिली आहे.

ट्रक चालक नावेद खान याच्या विरोधात भा.द.वि कलम 279, 37, 38 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंदाजे अर्धा ते एक तास अपघातामुळे पुणे कडे जाणारी वाहतूक थांबली होती. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

हायवे पोलीस आणि खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी वाहतूक नियमन केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.