Vallabhnagar Fire news: वल्लभनगर येथील बंद घरात लागली आग

एमपीसी न्यूज: वल्लभनगर येथील बंद घरात काल रविवारी रात्री 9 च्या सुमारास आग लागली होती.

वल्लभनगर मधील दत्तनगर भागात ही आग लागली होती. घरातील रहिवासी घर बंद करून बाहेर गेले होते. शेजारच्या लोकांना घरातून धूर बाहेर दिसल्याने त्यांनी अग्निशमन विभागाला कळवले.

साहेबांना मुलगा झाला, मोफत साडी अन् पैसे देऊ, फसवणुकीचा नवा ट्रेंड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयाची एक अग्निशमन बंब तेथे पोहोचली. अंदाजे 45 मिनिटात आग विजवण्यात आली.

आगीत घरातील फर्निचर जळून गेले. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.