Today’s Horoscope 20 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 September 2022
मंगळवार.
तारीख 20.09.2022
शुभाशुभ विचार- 8 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – दशमी श्राद्ध.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- पुनर्वसू 21.07 पर्यंत नंतर पुष्य.
चंद्र राशी- मिथुन 14.24 पर्यंत नंतर कर्क.
————————————–
मेष – शुभ रंग- राखाडी

महत्वाचे घरगुती निर्णय दिवसाच्या उत्तरार्धात घ्या. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आज आनंदीत व्हाल. सासूबाईंनी दिलेल्या शाब्बासकीने गृहिणी सुखावतील.

वृषभ- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही आज काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधुळ झाडतील. आज महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधणे हिताचे राहील.

मिथुन- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

आज स्वतःचेच खरे करू नका इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. अति आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकणार आहेत. कार्यालयीन कामाचे पेपर्स गहाळ होण्याची शक्यता आहे.

कर्क- शुभ रंग- क्रीम

संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. स्वतःसाठी उंची वस्त्र खरेदी कराल. आज गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल आजचा दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा तर विचारच सोडून द्य.

सिंह -शुभ रंग- केशरी

जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून जसे चिंताल तसेच होईल. आज कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे.

कन्या- शुभ रंग- डाळिंबी.

कामाच्या व्यापात तुमच्याकडून महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.

तूळ- शुभरंग- लाल

सज्जनांचा सहवास लाभेल आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळेल घरात एखाद्या धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

वृश्चिक- शुभ रंग- आकाशी

कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हीतशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. सतर्क रहा.

धनु- शुभ रंग- निळा

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

मकर- शुभरंग- जांभळा

कोणतीच गोष्ट सहज शक्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वस्तू होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

कुंभ- शुभरंग- गुलाबी – Today’s Horoscope 20 September 2022

हौशी मंडळींना चैन करण्यासाठी आज पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वतःचे लाड पुरवण्यासाठी मनसोक्त पैसा खर्च कराल. नवोदित कलाकारांना उत्तम संधी चालून येतील.

मीन- शुभरंग- पांढरा

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालावे लागेल. गृहिणींना मुलांच्या अभ्यासात लक्ष द्यावेच लागणार आहे. सौंदर्य प्रसाधनाची निगडित व्यवसाय असतील तर ते आज चांगले चालतील

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Samaj Kalyan Pune : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.