Today’s Horoscope 02 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग (Today’s Horoscope 02 March 2024)
आजचा दिवस- शनिवार.
तारीख – 02.03.2024
शुभाशुभ विचार- विशाखा वर्ज्य.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 9.30 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – विशाखा 14.42 पर्यंत नंतर अनुराधा.
चंद्र राशी – तुळ 8.17 पर्यंत नंतर वृश्चिक.
—————————–
मेष – ( शुभ रंग – पिस्ता)
आज आपल्या मर्यादेत राहिलेले बरे. धाडसाची कामे आज टाळली तर बर होईल. सासुरवाडी कडून एखाद्या लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्याच मताने वागणे हिताचे.

वृषभ ( शुभ रंग- निळा)
भागीदारीच्या व्यवसायात महत्त्वाचे निर्णय सामंजस्याने घ्या. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा )
ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळू शकेल.

Pimpri:महापालिकेच्या वतीने भव्य रानजाई महोत्सवाचे उद्घाटन

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस.

सिंह -( शुभ रंग – अबोली)
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून मुले तुमच्या आज्ञा पाळतील व त्यांची अभ्यासातील प्रगती तुम्हाला समाधान देईल. आज परिवारास वेळ देण्याचा आज तुम्ही आवर्जून प्रयत्न कराल.

कन्या – ( शुभ रंग- राखाडी)
दैनंदिन कामाचा कंटाळा येईल. आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होईल. बेरोजगारांना घराजवळच एखादा रोजगार मिळू शकेल. मुले आज खेळातच रमतील.

तूळ ( शुभ रंग- आकाशी) Today’s Horoscope 02 March 2024
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

वृश्चिक ( शुभ रंग – भगवा)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. इतरांची टिंगल टवाळी करण्याचा आनंद घ्याल. महत्त्वाच्या चर्चेत आज आपलेच घोडे तुम्ही पुढे दमटवाल.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. दुकानदारांनी आज उधारी उसनवारी टाळावी.

मकर (शुभ रंग- मोतिया)
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. अपुरी स्वप्न साकार होतील.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवलेले बरे.

मीन ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाहीत. वरिष्ठ आपल्यावर खुश आहेत असा गोड गैरसमज बाळगू नका. मनशांतीसाठी सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.