Todays Horoscope 21 April 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार गुरुवार, दि. 21.04.2022

  • शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 1.30 ते 03.00
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मूळ 21.51 पर्यंत नंतर पूर्वाषाढा.
  • चंद्र राशी – धनु.

—————————————-

आजचे राशीभविष्य –

मेष- (शुभ रंग- निळा)

घरात वडीलधाऱ्या मंडळींचे हट्ट पुरवावे लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे करावे लागेल. आज तुम्हाला थोडी एकांताची गरज भासेल. सत्संगाकडे पावले आपोआप वळतील.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. नोकरदारांनी आज नोकरीच्या ठिकाणी झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. कष्टाने यश साध्य होईल. आज प्रवास कंटाळवाणे होतील.

मिथुन -(शुभ रंग- हिरवा)

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध राहतील. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील आशादायी दिवस.

कर्क – ( शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी. दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होण्याची शक्यता आहे.

सिंह- ( शुभ रंग – लाल)

नवोदित कलाकारांना पूर्वीच्या उमेदवारीचे फळ मिळेल. गृहिणी आज घरासाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी करतील. चालू नोकरीत बदल करायचा असेल तर संधी चालून येतील.

कन्या- ( शुभ रंग- मोतिया )

आज प्रॉपर्टी विषयी काही व्यवहार मार्गी लागतील. प्रेम प्रकरणात मात्र नसती आफत होईल, सांभाळा. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

तुळ – ( शुभरंग -स्ट्रॉबेरी)

दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या ओळखी होतील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे.

वृश्चिक- ( शुभ रंग- आकाशी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणींना आज अचानक आलेल्या पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. प्रवासात दगदग होईल शक्यतो टाळा.

धनु -(शुभ रंग – भगवा )

अति स्पष्टवक्तेपणामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवला तर अनेक क्‍लिष्ट कामे सोपी होतील. विरोधकही आज नमते घेतील.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त आज बरीच पायपीट होणार आहे. पासपोर्ट, विजा विषयक कामे यशस्वी होतील.

कुंभ- ( शुभ रंग- नारिंगी )

सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल. विवाहविषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.

मीन – ( शुभ रंग – मरून)

यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्या ही महत्वाकांक्षा वाढतील. घरगुती गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन- ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.