Today’s Horoscope 22 October 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 October 2022

वार – शनिवार.

तारीख 22-10-2022

शुभाशुभ विचार- 18 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – धनत्रयोदशी

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30

दिशा शूल- पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- पूर्व फाल्गुनी 13.50 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.


आजचे राशिभविष्य 

मेष – शुभ रंग- हिरवा

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीचा ही विचार करा.

वृषभ- शुभ रंग- सोनेरी

तुमच्या सामाजिक प्रतिष्ठित वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस.

मिथुन- शुभ रंग- राखाडी

आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. गृहिणी शेजार धर्म जपतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

कर्क- शुभ रंग- पांढरा

धनस्थानातील चंद्रग्रहण तुमची आवक वाढवेल आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव राहील गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.

सिंह -शुभ रंग- निळा

दुकानदारांची थकीत उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल वैवाहिक जीवनात जुन्या स्मृती मनास आनंद देतील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल

कन्या- शुभ रंग- डाळिंबी

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. गृहिणी आज घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

तूळ- शुभरंग- आकाशी

आज हार्ड वर्क टाळून स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रांनी दिलेल्या खोट्या स्तुतीने आज तुम्ही भारावून जाल. स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल.

वृश्चिक- शुभ रंग- मरून

आज इतर गोष्टींपेक्षा तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल आज तुम्ही आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

धनु- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ 100% असेल. नोकरीत थोडे साहेबांच्या मागेपुढे करावे लागेल. कुणाला आज मोफत सल्ले वाटप करू नका.

मकर- शुभरंग- पिस्ता

जे चाललय ते बरे चाललय अस समजा. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह करू नका. धाडसाची कामे आज टाळा. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो

कुंभ- शुभरंग- मोरपंखी

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. तुमची आर्थिक बाजू आज भक्कम असल्याने थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत डोगवाल.

मीन- शुभरंग- भगवा

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना नशीबाची साथ नक्की मिळेल.

 

एमपीसी न्यूज च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा.

 

      शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.