Training of Trainers : संकल्प योजनेच्या ट्रेनिंग ऑफ ट्रेनरच्या दुसऱ्या बॅचचे शनिवारी इंजिनिअरिंग क्लस्टर येथे उद्धघाटन

एमपीसी न्यूज : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालया तर्फे “संकल्प” या योजने अंतर्गत 200 प्रशिक्षणार्थीचा ट्रैनिंग ऑफ ट्रेनर्स (Training of Trainers) हा कार्यक्रम चिंचवड येथील पुणे इंजिनीरिंग क्लस्टर येथे सुरु आहे. या मोफत कार्यक्रमातील दुसऱ्या बॅचचे उद्धघाटन श्री विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (दि.17) दुपारी तीन वाजता करण्यात येणार असल्याची माहिती इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे चे संचालक सागर शिंदे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यावेळी टाटा मोटर्सचे डिजिटल इनिशिएटिव्ह अँड स्पेशल प्रोजेक्ट विभागाचे सर्वना कुमार, इन्स्टिटयूट ऑफ क्वालिटी अँड रिलायबिलिटी इंडियाचे संचालक हेमंत उर्ध्वरेषे, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे अध्यक्ष सतीश काळोखे तसेच क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या चेअरमन डॉ. रजनी इंदुलकर आदी उपस्थित राहणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रशिक्षणार्थींना चांगला फायदा झाला असून सीएनसी प्रोग्रामिंग अँड ऑपरेशन्सची 2 री बॅच दि. 24 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णतः निःशुल्क असून प्रशिक्षणार्थींना 10,000 (दहा हजार) रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

Housing society garbage : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ऑक्टोबरपासून मोठ्या हौसिंग सोसायटयांकडून ओला कचरा घेणे बंद करणार

तसेच पुण्याबाहेरील प्रशिक्षणार्थींची मोफत भोजन व निवास व्यवस्था करण्यात येते. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना “ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल कौन्सिल” आणि “इंडो जर्मन चेम्बर ऑफ कॉमर्स” अशी दोन प्रमाणपत्र दिली जातात.(Training of Trainers) प्रशिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हि नक्कीच सुवर्ण संधी असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन इंजिनीरिंग क्लस्टर पुणे चिंचवड तर्फे करण्यात येत आहे.

या आठ आठवड्याच्या प्रशिक्षणातील सीएनसी प्रोग्रामिंग अँड ऑपरेशन्स, ऍडव्हान्स वेल्डिंग टेकनॉलॉजि, क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर हे कोर्स सध्या सुरु आहेत. सीएनसी प्रोग्रामिंग अँड ऑपरेशन्स ची पहिली एक बॅच यशस्वीरीत्या पूर्ण झाली झाली असून ऍडव्हान्स वेल्डिंग टेकनॉलॉजि या बॅचचे इंडस्ट्री मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग सुरु आहे.(Training of Trainers) टाटा मोटर्स सारख्या नामवंत कंपनी मधील निवृत्त प्रशिक्षकांकडून थेअरीचे प्रात्यक्षिकासहित एक महिन्याचे प्रशिक्षण, एक महिना इंडस्ट्री मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग ,जर्मन एक्स्पर्ट चे एक आठवडा प्रशिक्षण, एक आठवडा इंडस्ट्री एक्स्पर्टचे प्रशिक्षण असे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरूप आहे. आयटीआय, इंजिनीरिंग कॉलेजेस येथील प्रशिक्षक, प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रामधील वर्किंग प्रोफेशनल,लघुउद्योजक, निवृत्त अथवा स्वेच्छा निवृत्ती घेतलेले कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत.

शनिवारी “क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर” या नव्याने सुरु झालेल्या बॅचचा औपचारिक उदघाटन कार्यक्रम दुपारी तीन वाजता होणार आहे. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या सीएनसी बॅचचे निवडक प्रशिक्षणार्थी आपला अनुभव कथन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.