Pimpri : विरुद्ध दिशेने आलेल्या कारची दुचाकीला धडक

एमपीसी न्यूज – एकेरी वाहतूक सुरु असताना विरुद्ध दिशेने कार चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी सहाच्या सुमारास पिंपरी मधील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर घडली.

विरपाल करतारसिंग डिंग्या (वय 50, रा. सुभाषनगर, रिव्हर रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार यल्लालिंग किणगी (वय 23, रा. गोरे वस्ती, वाघोली) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरनाल करतारसिंग डिंग्या (वय 24, रा. सुभाषनगर, रिव्हर रोड, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील स्टेशन रोडवरील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून हॉटेल गोकुळच्या दिशेने येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. या पुलावरून विरपाल यांचा मुलगा वीरनाल गोकुळ हॉटेलकडून इंदिरा गांधी पुलावरून दुचाकीवरून (एम एच 14 / जी एफ 5242) जात होता. त्यावेळी यल्लालिंग इंडिका कार (एम एच 12 / जी झेड 4940) घेऊन पुलावरून गोकुळ हॉटेलच्या दिशेने जात होता. भरधाव वेगात कार चालवून त्याने वीरनाल याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये वीरनाल याच्या डोके, हात पाय, चेह-या गंभीर जखम झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.