Vadgaon Maval : पेट्रोल पंपासमोर दुचाकी जळून खाक

एमपीसी न्यूज – लांबचा प्रवास करून आल्यानंतर दुचाकीमध्ये पेट्रोल भरून गाडी पेट्रोल पंपाच्या बाहेर घेतली असता दुचाकीने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी वडगाव मावळ येथील आवडाई पेट्रोल पंपासमोर घडली.

एम एच 48 / ए एफ 4128 वरील चालक लांबचा प्रवास करून आला होता. तो जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात होता. दुचाकीमधील पेट्रोल संपल्याने वडगाव येथे आल्यानंतर आवडाई पेट्रोल पंपावर त्याने दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. पेट्रोल भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर आला असता पेट्रोलच्या टाकीतून पेट्रोल सांडू लागले. त्यामुळे त्याने दुचाकी बाजूला घेतली. दुचाकी गरम असल्यामुळे पेट्रोल सांडून आग लागली. यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. घटनेनंतर दहा मिनिटात जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बाहेर आले. विद्यार्थ्यांचा गलका होण्याआधी हा प्रकार निवळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकीला लागलेली आग विझवली. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रवीण चव्हाण यांनी तातडीने पाण्याचा टँकर पाठवला. टँकर चालक संजय जगताप यांनी ही विझवली. गणेश वहिले, राहुल गुरव, महेंद्र म्हाळसकर, स्वप्नील ढोरे, भूषण मुथा, दत्तात्रय लंके, नागेश ओव्हाळ या युवकांनी आग विझवण्यास मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.