Vadgaon Maval : जालना येथील घटनेचा वडगावमध्ये मोर्चाद्वारे निषेध

एमपीसी न्यूज – जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान लाठीहल्ला झाला. आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वडगाव मावळ (Vadgaon Maval) येथे मोर्चा काढून निषेध करण्यात आला. तसेच सोमवारी (दि. 4) मावळ बंदची हाक देण्यात आली.

Nigdi : ग्रामीण भागातही कलेची साधना पोहोचवली पाहिजे – पंडित अनिंदो चटर्जी

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश भेगडे, धनंजय मोरे, विजय तिकोणे, संजय शिंदे, भाऊसाहेब ढोरे, तुषार वहिले, बाळासाहेब शिंदे, सुधीर भोंगाडे, उमेश गावडे, राजेश वाघोले, चंदू दाभोळे, ऋषी म्हाळसकर आदींनी आज ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.

जालना साराटी येथे मराठा आरक्षण मिळावे यासाठी शांत पद्धतीने आंदोलन चालले असताना अचानक पोलिसांनी येऊन लाठीचार्ज केला, यात अनेक महिला, पुरुष, लहान मूले जखमी झाली. याचा निषेध म्हणून मावळ तालुक्यात सोमवारी बंद पाळण्यासाठी मावळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हाक देण्यात आली. मावळ बंदमध्ये तालुक्यातील सर्व कंपन्या व दुकाने बंद ठेवावेत.

तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेडिकल व अत्यावश्यक सेवा चालू राहतील असेही सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.