Vadgaon Maval : मावळच्या जुन्या क्रिकेटपटूंनी गाजवले पुन्हा मैदान

ओल्ड ईज गोल्ड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 1990 ते 98 दरम्यानचे क्रिकेटपटूंचे संमेलन

एमपीसी न्यूज- वडगांव मावळ येथील जुन्या खेळाडूंच्या क्रिकेट संघाचे स्नेहसंमेलन आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 1990 ते 1998 या दरम्यान क्रिकेटमैदान गाजवलेल्या वडगांव शहरातील नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊन खेळाचा आनंद लुटला आणि स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आठवणींना उजाळा दिला. या स्पर्धेत एकूण 97 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला

ओल्ड ईज गोल्ड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचे आणि स्नेहसंमेलनाचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून २५ ते २२ वर्षानंतर वडगांव मावळ येथील जुने क्रिकेटपटू एकत्र आले. या क्रिकेट स्पर्धेत जुन्या काळातील ६ संघानी सहभाग घेतला. या स्नेहसंमेलनाचे व स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यु ट्युब वर दाखवण्यात आले

या स्नेहसंमेलनाचे आणि क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे व नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फ्रेंड्स क्लब, बुलंदमावळ, ११ हनुमान, विजयनगर, यंगस्टार, अजिंक्य या संघामध्ये सामने खेळवण्यात आले. अजिंक्य व विजयनगर या दोन संघामध्ये अंतिम सामना त्यामध्ये अजिंक्य क्लबने ओल्ड ईज गोल्ड फिरत्या करंडकावर आपले नाव कोरले.

हा करंडक तीन वर्षे लागोपाठ विजयी होणार्‍या संघाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी वरिष्ठ खेळाडू म्हणून राजु कुलकर्णी, राजु सुर्वे, अविनाश चव्हाण, नामदेव घोलप, अशोक भिलारे, विजय काकडे, शैलेश ढोरे, यशवंत तांबे, अशोक ढोरे, संजय शिर्के, सुरेश ढोरे, सचिन जाधव, संतोष चव्हाण, मंगल दुबे, गिरीश झांबरे, ललित शहा, किरण कार्यकर्ते, गणेश गायकवाड यांनी सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन संतोष खैरे, सचिन आफळे, महेश कुलकर्णी, विनय सुर्वे, संतोष वाघमारे, मनोज जाधव, आनंद बाफना यांनी केले व या स्पर्धेत पंच व फोटोग्राफर म्हणून अमोल ठोंबरे, लखन आंबेकर, प्रशांत जाचक व समालोचक म्हणून अभिजित भिडे, बाळासाहेब भोंडवे, रवींद्र काकडे यांनी काम पाहिले. मार्गदर्शन शैलेश वहिले व सूत्रसंचालन अभय बवरे व आभार रजनीश ढोरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.