Vadgaon News : राजकीय पक्षांतील नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून श्रद्धांजली देण्यासाठी यावे- ललिता साठे-राक्षे 

एमपीसी न्यूज – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला उद्या सोमवार (दि.9) ऑगस्ट 2021 रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त या आंदोलनात शहीद झालेले मोरेश्वर साठे, शामराव तुपे, कांताबाई ठाकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करावी. कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याबाबत राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया ललिता अमीत राक्षे यांनी दिली. 

गेल्या 10 वर्षांपासून या विषयावर प्रत्येकजण राजकारण करत आहे. अद्यापपर्यंत या आंदोलनात मृत्यू पावलेल्या या व्यक्तींना शहीद हा दर्जा मिळाला नाही. मावळ पंचायत समितीच्या इमारतीला यांचे नाव देण्यात येणार होते. तेही दिले नाही.

गेल्या 10 वर्षांपासून केवळ या मुद्द्यावर राजकारण केले जाते आहे, आणि खोटी आश्वासने देण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय व्यक्तींनी यावरील राजकारण थांबवावे, असे आवाहन आंदोलनात मृत्यू झालेले शेतकरी मोरेश्वर साठे यांची मुलगी ललिता अमित राक्षे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.