Wakad : दुचाकीवरून जात असलेल्या व्यापाऱ्याची 14 लाखांची रोकड लुटली

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यापाऱ्याला खाली (Wakad ) पाडून त्याच्याकडील 14 लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास घडली.

मोहनदास सिरूमल तेजवाणी (वय 62, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : सहाय्यक आयुक्त आले अन् दहा दिवसांतच पंढरपूरला झाली बदली

तेजवाणी हे बुधवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून चालले होते. ते विजयनगर, काळेवाडी येथील बालाजी लॉन्सजवळ आले असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडले.

या अपघातात तेजवाणी जखमी झाले. त्यावेळी दुचाकीवरील दोन चोरट्यांनी तेजवाणी त्यांच्याकडील 14 लाखांची रोकड लुटून नेली. वाकड पोलीस तपास करीत (Wakad ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.