PCMC : सहाय्यक आयुक्त आले अन् दहा दिवसांतच पंढरपूरला झाली बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीर्थक्षेत्र देहू नगरपरिषदेचे ( PCMC)  मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव हे सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले होते. त्यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जबाबदारी दिली होती. मात्र, अवघ्या 10 दिवसांत त्यांची पंढरपूरला बदली झाली असून त्यांना पालिकेतून कार्यमुक्तही करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी डॉ. जाधव हे 9 ऑक्‍टोबरला महापालिकेत रूजू झाले. दोन-तीन दिवस त्यांच्याकडे कोणताच पदभार दिला नव्हता. त्यानंतर आयुक्त सिंह यांनी त्यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली होती.

मात्र, ते महापालिकेच्या कामकाजात काही रमले नाहीत. त्यांची दहा दिवसात राज्य सरकारने बदली केली आहे. डॉ. जाधव हे पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून मंगळवारी (दि. 17) रूजू झाले. त्यामुळे त्यांना महापालिकेने कार्यमुक्त केले आहे.

Pune-Lonavala Local Train : पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे विभाग घेणार आढावा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत डॉ. जाधव यांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून प्रतिनियुक्तीवर नियुक्तीवर पाठविले होते. राज्यभरातील अनेक अधिकारी या श्रीमंत महापालिकेत नियुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. तर काही अधिकारी पदोन्नती झाल्यानंतर पुन्हा महापालिकेत आले आहेत. त्यामुळे या पालिकेत येण्यासाठी मोठी स्पर्धा आहे.

असे असताना सहाय्यक आयुक्त जाधव यांना नियुक्ती मिळून ते 10 दिवसांत बदली करून पंढरपूरला गेले. या प्रकाराबद्दल पालिका वतुर्ळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, डॉ. जाधव यांची पंढरपूरला बदली झाल्याने ड क्षेत्रीय कार्यालयाच्या पदभार प्रशासन अधिकारी अंकुश जाधव यांच्याकडे ( PCMC)  सोपविला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.