Wakad : पीएमपीएमएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने दुचाकीला (Wakad)धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास कस्पटे चौक, वाकड येथे घडली.

अनिल बाबुराव बिडवे (वय 32, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस क्रमांक एमएच 12/टीव्ही 0330 या बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL 2023 – डूप्लेसेस आणि कोहलीने आरसीबी ला सहज विजय मिळवून दिला; यावर्षी मुंबईचा पहिला सामना देवालाच!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल हे त्यांच्या दुचाकीवरून कस्पटे चौक येथून जात होते. चौकातून ते उजवीकडे वळत असताना भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएल बसने डाव्या बाजूने अनिल यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात अनिल हे दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यात ते जखमी (Wakad) झाले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.