IPL 2023 – डूप्लेसेस आणि कोहलीने आरसीबी ला सहज विजय मिळवून दिला; यावर्षी मुंबईचा पहिला सामना देवालाच!

एमपीसी न्यूज – रविवारी दिनांक 2 एप्रिल रोजी झालेल्या दुसरा सामन्यामध्ये ( IPL 2023) आरसीबीने मुंबई इंडियन्सला 8 बळी आणि 22 चेंडू राखून मारले. चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये दमदार विजय मिळवून आरसीबी ची स्वतःच्या घरेलू समर्थकांसमोर आयपीएलमध्ये उत्तम सुरुवात झाली. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसेस हा सामनावीर ठरला. कालचा सामना हरल्यावर मुंबई इंडियन्सने सलग अकराव्या आयपीएल मध्ये स्वतःचा पहिला सामना हरला आहे म्हणजेच देवाला दिला आहे.
मुंबईचे सुरुवातीचे फलंदाज हे फार स्वस्तात गेले. कर्णधार रोहित शर्मा ने दहा चेंडू मध्ये फक्त एकच धाव काढली. ईशान किशन (10), सूर्यकुमार यादव (15) आणि कॅमेरामन हेही (5)काही जास्त टिकले नाहीत. मुंबई इंडियन्स काही जास्त धावसंख्या काढू शकणार नाही असेच वाटत असताना टिळक वर्मा ने उत्तम कामगिरी करत 46 चेंडू मध्ये 84 धावा काढल्या.

 

 

 

Pimpri News : वीज दरवाढीचा सामान्यांना फटका, दरवाढ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन – काशिनाथ नखाते

टिळक वर्मा हा शेवटपर्यंत नाबाद असल्याने त्याने मुंबई इंडियन्सला स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. आरसीबी कडून मोहम्मद सिराज, रीस टॉपली, आकाशदीप, हर्षल पटेल आणि मायकल ब्रेसवेल या सर्वांनी एक एक बळी बाद केले. फिरकी गोलंदाज करण शर्माने दोन बळी घेतले.

फाफ डुप्लेसीस आणि विराट कोहलीने आरसीबी ला खूपच चांगली सुरुवात दिली. मुंबई इंडियन्स ने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून जेसन बेहेरेन्डॉर्फ ला सूर्यकुमार यादव च्या जागी आणले. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही कारण का त्याला आणि त्याच्या नव्या चेंडूच्या जोडीदाराला पहिल्या तीनच ओवर मध्ये विराट कोहली आणि डुप्लेसेसने 30 धावा काढून बेदम चोपले.
नुसता बेहेरेन्डॉर्फच नाही तर मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज चोप्रा आर्चरलाही दोन्ही सलामी फलंदाजाने भरपूर षटकार आणि चौकारांचा वर्षाव केला. 172 भावांच्या लक्षाचा पाठलाग करताना विराट कोहलीने 49 चेंडूंमध्ये 82 धावा काढल्या तर त्याचा जोडीदार फाफ डूप्लेसेस याने 43 चेंडू मध्ये 73 धावा काढल्या. आरसीबीने मुंबई इंडियन्स कडून मिळालेले लक्ष 17 व्या षतकातच पार केले.

 

 

 

मुंबई इंडियन्सचा संघ काल फारच दिशाहीन दिसत होता. आरसीबीच्या सलामी फलंदाजाने त्यांना थोडेही ‘ मार्जिन ऑफ एरर’ दिले नाही असे आपण म्हणू शकतो. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस यांच्या चांगल्या फॉर्ममुळे आरसीबी यावर्षी चांगले करेल असे सांगू शकतो. परंतु मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने जर स्वतःच्या संघाच्या गोलंदाजी कडे लक्ष दिले नाही तर मुंबईचे( IPL 2023) हाल हे मागच्या वर्षी सारखेच होऊ शकते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.