India News – कर्णधार रोहित शर्माचे डब्ल्यूटीसीच्या अपयशानंतरच्या शंकांना उत्तर; गोलंदाजी पर्याय कमी असल्याबाबत खंत

एमपीसी न्यूज – डब्ल्यूटीसीमध्ये अपमानजनक पराभवानंतर रोहित शर्माच्या ( India News) कर्णधारपदावर बऱ्याच क्रिकेट चाहत्यांनी व तज्ञांनी प्रश्न उठवले होते. रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून अपयशी आहे व भारतीय संघासाठी तो योग्य नव्हे अश्या टीका त्याच्यावर करण्यात आल्या होत्या.

Pcmc : वाराणसीचे महापालिका आयुक्त सिपू गिरी यांची शहरातील विकास प्रकल्पांना भेट

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सुद्धा भारताच्या पराभवासाठी रोहित शर्माला जबाबदार मानले होते. या सर्व शंकांची उत्तरे रोहित शर्माने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, ” सर्वप्रथम, प्रत्येक खेळाडू उपलब्ध असावा अशी माझी इच्छा आहे. माझे सर्व खेळाडू, त्यांनी 100 टक्के उपलब्ध असावे.. मला कोणत्याही दुखापतीची चिंता नको आहे.संघाने दुखापतीने त्रस्त नसणे हे माझ्यासाठी फार महत्वाचे आहे.

गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून मला जसप्रीत बुमराहशिवाय सामने खेळायला लागले आहेत. वेगवान गोलंदाजांनी भरपूर विकेट घेतल्याचे आपण पाहिले आहे. ते असून खेळाडू  जखमी होतात आणि आम्हाला दुर्दैवाने त्यांना बदलावे लागते.” पुढे  “हमारे पास फास्ट बॉलर्स की लाइन नही लगी हुई है!” असे म्हणत त्याने स्वतःचे विचार पूर्ण केले.

रोहित शर्माने जेव्हापासून कर्णधार पदाची सूत्र हातात घेतले तेव्हापासून त्याला अधू खेळाडू त्याचा पदरी पडले आहेत. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, आदी खेळाडूना दुखापत झाली असून त्यांची अनुपलब्धी ही मोठ्या सामन्यांमध्ये भारताला तीव्रपणे जाणवून येते.

दुखापतींचा संदर्भ न बघता सर्व तज्ञ आणि चाहते कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी खेळाडू विराट कोहली याना छाननी मध्ये घेतात असे सोशल मीडिया वर दिसून येते व त्याच बाबत काल रोहित शर्मा याने स्वतःचे मत मांडले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.