Pcmc : वाराणसीचे महापालिका आयुक्त सिपू गिरी यांची शहरातील विकास प्रकल्पांना भेट

एमपीसी न्यूज – वाराणसी महानगरपालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिपू गिरी, सनदी अधिकारी जयदेव चंद्रशेखर यांनी आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड महापालिका (Pcmc) आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या विविध विकास प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.

Pimpri : पिंपरी-चिंचवड संगीत अकादमीच्या मासिक संगीत सभेत ताल रसिकांची भरभरून दाद

आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उद्यान विभागाचे प्रमुख रविकिरण घोडके आदी उपस्थित होते.

प्रसंगी, सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड (Pcmc) महानगरपालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणा-या आरोग्य सेवा, स्वच्छता, ई-क्लास रूम प्रकल्प, पाणी पुरवठा, स्वच्छ सर्वेक्षण, रस्ते विकास, कर आकरणी, उद्यान, पर्यावरण विभागामार्फत सूरू असलेल्या उपाययोजना तसेच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली.

सुरुवातीला गिरी यांनी मनपा भवनाची पाहणी करून विभागानुसार माहिती जाणून घेतली. तसेच, स्मार्ट सिटी कार्यालय येथे विविध सेवांच्या डिजिटलायझेशनबाबत महापालिका व स्मार्ट सिटी उपक्रमांचे सादरीकरण, तसेच निगडीतील इंटीग्रेटेड कंमाड कंट्रोल सेंटर येथे भेट देवून कचरा संकलन, पाणी पुरवठा, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतुक व्यवस्था याबाबत प्रत्यक्ष कार्यपध्दतीची माहिती घेतली. तसेच, अटल बिहारी वाजपेयी उद्यानात भेट देवून तेथील कामाची पाहणी केली.

‍पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी मार्फत जे लोकोभिमुख प्रकल्प राबविले जात आहेत. ते नक्कीच शहराच्या विकासात लाभदायी ठरणारे असून वाराणसी महानगरात सुध्दा असे प्रकल्प राबविण्यात भर देणार असून डिजीटल भारताच्या विकासाला यातून चालना मिळणार असल्याचे सांगून गिरी यांनी येथील विकास प्रकल्पांचे कौतुक केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.